Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कुकडीच्या आवर्तनाचा 9 एप्रिलला फैसला

कुकडीच्या आवर्तनाचा 9 एप्रिलला फैसला

श्रीगोंदा । वीरभूमी- Apr 01, 2021 • 12:00 AM 1855 views
कुकडीचे आवर्तन सोडण्याकरीता 9 एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरीत पावले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही. पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा निर्णय त्वरीत घेतला जावा.

यासाठी आपण सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. आता पुण्यात या संदर्भात बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यात आवर्तनाचा विषय मार्गी लागेल. पाण्याची उपलब्धता व वापर याबाबत श्रीगोंद्यावर अन्याय होणार नाही, याची लोकप्रतिनिधी म्हणून दक्षता घेतली जाईल.

विसापूर कालव्याखालील शेतकर्‍यांना पाणी मिळावे, या मागणीसाठी 5 एप्रिल रोजी श्रीगोंद्यात कुकडी विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

घोडद्वारे नदीवरील बंधार्‍यात पाणी सोडण्याची मागणी आपण यापूर्वी केली होती. सरकारने याची दखल घेतली आहे. 5 एप्रिल रोजी शिरूरचे आमदार अशोक पवार व माझ्या उपस्थितीत घोडमधून बंधार्‍यात पाणी सोडण्यात येणार आहे.

त्याचा फायदा श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील नदी काठच्या शेतकर्‍यांना होईल, असा दावा श्री. पाचपुते यांनी निवेदनात केला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply