Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

दिलासादायक ः उपचार सुरू असणार्‍या रुग्ण संख्येत घट

आज मंगळवारी 2198 जणांची कोरोनावर मात । 33 जणांचा मृत्यू

अहमदनगर । वीरभूमी- May 25, 2021 • 12:00 AM 1461 views
जिल्ह्यात आज तब्बल 2198 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 34 हजार 665 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात वाढ होऊन ते आता 92.76 टक्के इतके झाली आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला असतांनाच गेल्या चोवीस तासात तब्बल 33 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, आज जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 2191 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आता 15 हजार 402 इतकी झाली आहे.

आज मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 565, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 811 आणि अँटीजेन चाचणीत 815 रुग्ण बाधीत आढळले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये श्रीरामपूर 320, पाथर्डी 219, संगमनेर 171, नेवासा 159, राहाता 158, पारनेर 157, श्रीगोंदा 156, नगर ग्रामीण 155, शेवगाव 151, कोपरगाव 121, नगर शहर 108, जामखेड 102, राहुरी 78, कर्जत 57, अकोले 44, इतर जिल्हा 26, भिंगार 07, मिलटरी हॉस्पिटल 01, इतर राज्य 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 126, अकोले 110, जामखेड 85, कर्जत 133, कोपरगाव 128, नगर ग्रामीण 129, नेवासा 294, पारनेर 160, पाथर्डी 179, राहाता 94, राहुरी 160, संगमनेर 111, शेवगाव 111, श्रीगोंदा 188, श्रीरामपूर 142, कॅन्टोन्मेंट 02 आणि इतर राज्य 46 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 52 हजार 970 वर पोहोचली असून आतापर्यंत तब्बल 2 लाख 34 हजार 665 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 2903 रुग्णांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. तर सध्या 15 हजार 402 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, विनाकारण घराबाहे पडू नये, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित स्वच्छ हात धुवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply