Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

दिलासादायक ः रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 94.33 वर

आज शनिवारी 1796 जणांची कोरोनावर मात । 26 जणांचा मृत्यू

अहमदनगर । वीरभूमी- May 29, 2021 • 12:00 AM 1435 views
जिल्ह्यात आज तब्बल 1796 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 45 हजार 042 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात वाढ होऊन ते आता 94.33 टक्के इतके झाली आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला असतांनाच गेल्या चोवीस तासात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, आज जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 1588 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आता 11 हजार 629 इतकी झाली आहे.

आज शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 479, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 530 आणि अँटीजेन चाचणीत 579 रुग्ण बाधीत आढळले.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 91, अकोले 201, जामखेड 23, कर्जत 90, कोपरगाव 68, नगर ग्रामीण 95, नेवासा 92, पारनेर 115, पाथर्डी 113, राहाता 81, राहुरी 185, संगमनेर 354, शेवगाव 46, श्रीगोंदा 73, श्रीरामपूर 146, कॅन्टोन्मेंट 01, इतर जिल्हा 22 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 59 हजार 783 वर पोहोचली असून आतापर्यंत तब्बल 2 लाख 45 हजार 042 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 3112 रुग्णांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. तर सध्या 11 हजार 629 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply