Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

जिल्ह्याला मोठा दिलासा; कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत

पाथर्डी तालुका वगळता इतर तालुके शंभरच्या आत

अहमदनगर । वीरभूमी - Jun 02, 2021 • 12:00 AM 3133 views
अहमदनगर जिल्ह्याला बुधवारी मोठा दिलासा मिळाला आहे. एक दिवस कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये वाढ तर एक दिवस कमी असा पाठशिवणीचा खेळ सुरू असतांना आज नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज बुधवारी मंगळवारच्या तुलनेत 294 ने घट झाली आहे. आज बुधवारी जिल्ह्यात एकुण 858 कोरोना बाधित आढळले आहेत. आज आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा हजाराच्या आत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आज बुधवारी दरदिवशी आढळणार्‍या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत आला आहे. आज आढळलेल्या आकडेवारीत पाथर्डी तालुका सर्वोच्च स्थानावर गेला आहे तर इतर तालुके शंभरच्या आतमध्ये आहेत.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 188, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 308 तर अँटीजेन चाचणीत 362 असे 858 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- पाथर्डी 132, कर्जत 78, नगर ग्रामीण 61, श्रीगोंदा 60, नेवासा 59, संगमनेर 59, श्रीरामपूर 57, नगर शहर 54, राहुरी 49, पारनेर 47, कोपरगाव 39, अकोले 35, राहाता 35, शेवगाव 33, जामखेड 27, इतर जिल्हा 21 भिंगार 08, मिलटरी हॉस्पिटल 04 असे कोरोना बाधित आढळले आहे.

नागरिकांनी असाच संयम ठेवल्यास आकडेवारी कमी होऊन संपूर्ण जिल्हा कोरोना मुक्त होईल. यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमासह शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply