Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

जिल्ह्यातील आणखी 21 गावांत लॉकडाऊन

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश । 23 ऑक्टोबर पर्यंत निर्बंध

अहमदनगर । वीरभूमी- Oct 14, 2021 • 12:00 AM 3380 views
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटत असतांना अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सात तालुक्यातील 21 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने या गावांमध्ये 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात कडक निर्बंध असणार आहेत.

याबाबत बुधवारी रात्री कडक निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सहीने जाहीर केले. या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या 300 ते 500 दरम्यान आढळून येत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3 ते 5 टक्के दरम्यान आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ज्या गावांत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे तेथे लॉकडाऊन जाहीर केला जात आहे.

मागील आठवड्यात जिल्ह्यातील 69 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची मुदत संपुष्टात आली आहे. यानंतर आता पुन्हा जिल्ह्यातील 21 गावांमध्ये जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात कडक निर्बंध जाहीर केले आहेत.

आज लॉकडाऊन जाहीर केलेल्या गावांमध्ये वीरगाव, सुगाव बु., कळस बु. (ता. अकोले), टाकळी (ता. कोपरगाव), चांदा (ता. नेवासा), जामगाव, वासुंदे, (ता. पारनेर), उंबरी, वेल्हाळे, चंदनापुरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे (ता. संगमनेर), पिंपळगाव माळवी (ता. नगर), लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ (ता. श्रीगोंदा) अशा 21 गावांचा समावेश आहे.

लॉकडाऊन जाहीर केलेल्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना व दुकाने बंद असणार आहे. तसेच या परिसरातून अत्यावश्यक सेवा व कृषी माल वाहतूक वगळता इतर वाहतुकीस निर्बंध असणार आहेत. तसेच पाच व पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास निर्बंध जाहीर केले आहेत.

नागरिकांनी कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply