Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कर्जत बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील तो खड्डा पत्रकारांनीच बुजविला

कर्जत बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील तो खड्डा पत्रकारांनीच बुजविला

कर्जत । वीरभूमी- Oct 27, 2021 • 08:47 PM 1006 views

कर्जत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अनेक महिन्यापासून जवळपास अर्धा फुट खोलीचा मोठा खड्डा पडला होता. या खड्डयात एसटी बससह बसस्थानकात येणारे लहान- मोठे प्रत्येक वाहन आदळत होते.

यामुळे अनेकदा वाहनांचे नुकसान देखील झाले. मात्र त्या खड्डयाकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष होत असताना बुधवार, दि. 27 रोजी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी स्वतः पुढे येत अवघ्या 10 मिनिटातच तो अपघाती खड्डा बुजविला.


कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट : //veerbhuminews.com/VeerBhumi/news/1585


कर्जत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराला एक भला मोठा खड्डा पडला होता. अनेक महिन्यापासून खड्डयाकडे स्थानिक प्रशासनाने देखील दुर्लक्षच केले. या अपघाती खड्डयात एसटी बससह इतर वाहने देखील आदळत होती. यामुळे अनेकदा काही वाहनांचे छोटे मोठे नुकसान होत असताना कोणीच त्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हती.

यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे सदस्य डॉ. अफरोजखान पठाण यांनी सदरची बाब पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या कानावर टाकली असता शिंदे यांनी कर्जत तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी गणेश जेवरे, सुभाष माळवे, मच्छीन्द्र अनारसे, मुन्ना पठाण यांना भ्रमणध्वनीवर संदेश देत तात्काळ बसस्थानकाच्या परिसरात बोलविले.


डॅशिंग डीवायएसपी संदीप मिटकेंची धडाकेबाज कारवाई : //veerbhuminews.com/VeerBhumi/news/1583


बसस्थानक प्रवेशद्वारात असलेल्या अपघाती खड्डयाची परिस्थिती पाहिली. यावेळी सर्व पदाधिकार्‍यांनी तात्काळ तो अपघाती खड्डा बुजविण्यासाठी स्वतःच पुढाकार घेत दगड- खडी- चाळ गोळा करत अनेक महिन्यापासून डागडुजीच्या प्रतीक्षेत असणारा तो खड्डा अवघ्या दहाच मिनिटात समतल केला.

यावेळी अनेक उपस्थितांनी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत धन्यवाद दिले. बस चालकांनी देखील खड्डा बुजवत असताना पत्रकारांना बस उभा करीत त्यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply