Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

हनुमान टाकळीत एलसीबीची वाळू तस्करांवर कारवाई

हनुमान टाकळीत एलसीबीची वाळू तस्करांवर कारवाई

अहमदनगर । वीरभूमी- Dec 01, 2021 • 11:04 PM 1178 views
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी शिवारातील नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा करणार्‍यांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आल्या असून 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी शिवारातील नदीपात्रात दोन इसम अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी माहितीची खातरजमा करुन पो. काँ. विनोद मासाळकर, पोना. शंकर चौधरी, संतोष लोंढे, संदीप चव्हाण, जालिंदर माने यांच्या पथकाला सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.

या आदेशानंतर पथकाने छापा टाकला असता हनुमान टाकळी शिवारातील नदी पात्रात दोन इसम हे ट्रॅक्टर उभा करुन ट्रॉलीमध्ये मजुरांच्या साह्याने वाळू उपसा करतांना दिसले.

पोलिस येतांना दिसताच एका ट्रॅक्टरवरील चालक, वाळू भरणारे मजूर नदीतील झाडा-झुडपांच्या आडोश्याचा फायदा घेऊन पळून गेले. तर दुसर्‍या ट्रॅक्टरच्या चालकास जागीच ताब्यात घेतले.

त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव भाऊसाहेब बाबासाहेब दगडखैर (रा. हनुमान टाकळी) असे सांगितले. त्याने वाळू उपसा करण्यासाठी कुठलाही परवाना घेतला नसल्याचे सांगितले.

पोलिसांनी नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा करणार्‍या दोन ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केले असून आरोपीकडून 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply