Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात कोपरगाव दुसर्‍या क्रमांकावर

लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणार ः तहसीलदार विजय बोरूडे

कोपरगाव । वीरभूमी- Dec 02, 2021 • 02:06 PM 753 views
जिल्ह्यात कोपरगाव तालुका लसीकरण करण्यात दुसर्‍या नंबरवर असून लवकरच आपल्या सर्वांच्या सहकार्याने 100 टक्के लसीकरण पूर्ण करू असा विश्वास तहसीलदार विजय बोरुडे यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात प्रथम क्रमांक संगमनेर तालुक्याचा असून लसीकरणाची टक्केवारी 78.15 इतकी आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर कोपरगाव तालुका असून टक्केवारी 77 इतकी आहे. तालुक्यात घरोघरी जाऊन लस देण्याचे काम सुरू आहे.

तहसीलदार श्री. बोरुडे व आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक, सेविका व संबंधित अधिकारी गावोगावी भेट देऊन लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका वाड्या -वस्त्यावर जाऊन राहिलेल्या नागरिकांना समजावून सांगत लस घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेने चांगला वेग घेतलेला दिसून येत आहे.

तालुक्यात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून शहरात एक केंद्र आहे. तालुक्यात सर्वात लसीकरण वारी येथील आरोग्य केंद्रात सुमारे 99.18 टक्के इतके झाले आहे. तर सर्वांत कमी पोहेगाव आरोग्य केंद्रात 69.63 टक्के इतके झाले आहे. अजूनही काही गावामध्ये लसीकरण वेग वाढविणे गरजेचे असल्याचे व 100 टक्के लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन तहसीलदार श्री. बोरुडे यांनी जनतेला केले आहे.

तालुक्यातील सहा आरोग्य केंद्रामध्ये झालेले लसीकरण - (कंसात दुसरा डोसची टक्केवारी) - चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र - 76.07 टक्के (21.13 टक्के), दहेगाव बोलका- 71.39 टक्के (25.94 टक्के), पोहेगाव- 69.69 टक्के (19.37 टक्के), संवत्सर- 79.42 टक्के (24.37 टक्के), टाकळी - 71.70 टक्के (21.40 टक्के), वारी- 99.18 टक्के (44.83 टक्के), कोपरगाव शहर- 81.12 टक्के (42.13 टक्के) असे लसीकरण झाले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply