Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

आपण दोन वर्षात काय विकासकामे केली ते समोरासमोर एकदा सांगाच

राम शिंदेचे आ. रोहित पवार यांना खुले आव्हान । सोमवारी भाजपाचे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

कर्जत । वीरभूमी- Dec 06, 2021 • 11:13 PM 602 views
खर्डा किल्यावरील स्वराज्य ध्वज हा बारक्या पवारांचा आहे. त्यामुळे दोन्ही मोठे पवार साहेब त्या कार्यक्रमास आले नाहीत. भगवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो माझ्या वारकरी बंधुचा आहे मात्र यांनी तो स्वतःचा केला. त्यामुळे 18 दिवसांतच तो फाटला आणि आता फक्त तेथे दांडाच शिल्लक राहिला. जातीपातीचे राजकारण करायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची असे विद्यमान लोकप्रतिनिधी करीत आहेत. यांनी दोन वर्षात काय विकासाचे काम केले आहे ते एकदा आमने सामने झालेच पाहिजे, असे म्हणत माजीमंत्री राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांना खुले आव्हान दिले.

कर्जत नगरपंचायतीसाठी भाजपाच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या सभेत माजीमंत्री राम शिंदे बोलत होते. यावेळी खा. सुजय विखे, जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे, युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, जामखेडचे अजय काशीद, रवी सुरवसे आदी उपस्थित होते.

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले की, आपण विधानसभेत सांगितल्याप्रमाणे कर्जत शहराचे सर्व प्रलंबित प्रश्न प्रामाणिकपणे सोडविले. मंत्रीपदाचा भार घेतल्यावर सर्वप्रथम कर्जतचा पाणीप्रश्न तात्काळ सोडविला. यासह सर्व प्रभागात अनेक रस्ते, स्मशानभूमी, गार्डन, चौक सुशोभीकरण कामे मार्गी लावले. त्यामुळे आपल्याला कर्जतच्या जनतेला मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळेच यंदाची कर्जत नगरपंचायतीची निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या हाती दिली आहे. दोन वर्षात आपण पत्रकार परिषद घेत मतदारसंघातील समस्या उपस्थित केल्या. मात्र विद्यमान आमदारांनी त्यास उत्तर देखील दिले नाही. यातच त्यांचे काम आणि त्यांची हतबलता दिसते.

सध्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे जमिनीचे सातबारा उतारे धोक्यात आहेत. कर्जत शहरात दोन राजकीय पक्षाचे जिल्हाअध्यक्ष आहे. मात्र त्यांना देखील भेट देत नाही, हाच लोकप्रतिनिधीचा विकास आहे. सध्या ते फक्त गप्पा मारण्याचे काम करून जनतेला फसवीत आहेत. लोकांना दिलेला शब्द त्यांनी प्रामाणिकपणे पाळावा. सर्वसामान्य जनतेला दबावाखाली आणू नका, हा राम शिंदे या जनतेसाठी जीवाची बाजी लावून पुढे उभा राहील. आता जनता दडपशाही, मुस्कटदाबी सहन करणार नाही. या निवडणुकीत भूलथापाना बळी पडू नका विकासकामे मनात ठेवून भाजपाला साथ द्या, अशी साद राम शिंदे यांनी मतदारांना घातली. आपण अभिमानी आणि स्वाभिमानी आहोत याची प्रचिती कर्जतकरांनी विरोधकांना द्यावी असे आवाहन केले.

खा. सुजय विखे म्हणाले की, ज्या माणसाने मोठे करून विविध पदे दिली. आज त्यांनीच राम शिंदेचा विश्वासघात केला. त्यामुळे आजची निवडणूक ही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी अशी नसून ती विश्वासघातकी माणसाची लायकी दाखविणारी आहे. राम शिंदे यांच्या पाठीमागे जनता उभी राहणार आहे. कारण त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी काम केले आहे. आमचे उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. ते सर्वसामान्य नागरिकांच्या हवाली केले आहे. त्यामुळे जनतेनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन खा. विखे यांनी उपस्थित जनतेला केले.

विरोधकानी प्रदीर्घ काळ नुसते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी लावला. याचाच अर्थ त्यांनी राम शिंदे आणि भाजपाचा मोठा धसका घेतला आहे, हे अधोरेखित होत असून आगामी निवडणुकीत भाजपला साथ द्यावी असे म्हटले.

प्रास्ताविक करताना नुतन जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे म्हणाले की, माजीमंत्री राम शिंदे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात विकासाची कामे झाली. या विकासकामामुळे कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलला. खा. सुजय विखे यांनी देखील आपल्या कार्याने त्यावर कळस उभा केला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भाजपाचे युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, आरपीआयचे शशिकांत पाटील, दादासाहेब सोनमाळी, अल्लाउद्दीन काझी, वैभव शहा, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर यांची भाषणे झाली. याप्रसंगी इच्छुक उमेदवार, राजकीय पदाधिकारी आणि भाजपा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश जेवरे यांनी केले तर अनिल गदादे यांनी आभार मानले.

त्यांचे काम फक्त दमदाटी करणे आणि पक्षात घेणे ः सुवेंद्र गांधी
माजीमंत्री राम शिंदे यांनी आपल्या मंत्रीपदाचा वापर करत कर्जत शहराचा चेहरा बदलला. परिसरातील विकासकामे पाहता आगामी निवडणुकीत भाजपा भरघोस यश संपादन करेन असा विश्वास वाटतो. विरोधकांनी दोन वर्षात सर्वसामान्य जनतेसाठी काहीच केले नाही. त्यांनी फक्त मतदारसंघात दहशत आणि दमदाटी करून लोकांना आपल्या पक्षात सामील केले असे नाव न घेता आ. रोहित पवार यांना लक्ष केले.

2) भाजपात असणारा टायगर राष्ट्रवादीत म्याव म्याव करायला लागला ः जिल्हा अध्यक्ष मुंढे
राम शिंदे यांनी विश्वास टाकून प्रथम नगराध्यक्ष केले. स्थानिक भाजपात मोठे पद दिले. भाजपात असताना तो टायगर म्हणून वावरत होता. मात्र पक्षातून तिकडे गेला आणि म्याव म्याव करायला लागला, असे नामदेव राऊत यांचे नाव न घेता भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी टीकास्त्र सोडले. विद्यमान आमदार फक्त लबाडी करण्यात धन्यता मानतात. जनतेला फसविण्यात हे तरबेज, असे म्हणत आ. रोहित पवार यांना टोला लगावला.

3) साहेब आता तरी सुधरा ः खा. सुजय विखे
साहेब, तुम्ही अनेकांना मोठे केले. त्यांनी तुमचा विश्वासघात केला. उद्या परत तुम्ही आमदार होणार पण आता तुमच्या स्वभावात बदल करा. जे आपले आहे त्यांना सोबत घ्या. आणि जे दूर गेले त्यांना दूरच राहू द्या. कारण तुम्ही फार साधे व्यक्ती आहात. पण आपल्या सोबत असणार्‍यांनी आपल्याला दगा दिला. पण मी थोडा वेगळा आहे. मी ज्यांनी दगा दिला त्यांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. कारण मी विखे घराण्याचा माणूस आहे, असे म्हणत पक्षांतर केलेल्यांना सुचक इशारा दिला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply