Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

ओमीक्रोनने अकोलेकरांचे टेन्शन वाढले!

परदेशातून आले सात नागरीक । एकाचा शोध चालू

अकोले । वीरभूमी- Dec 08, 2021 • 10:19 PM 813 views
संपूर्ण देशाला ओमिक्रोन विषाणूची चिंता लागून आहे. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात परदेशातून सात नागरिक आल्याने अकोलेकरांचे टेन्शन वाढले आहे. प्रशासनाने परदेशातून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट घेतल्या असून त्यांना होम कॉरन्टाईन केले आहे.

नेदरलँड या देशातून चार नागरिक उंचखडक येथे आले आहेत. ओमान (दुबई) या देशातून एक व्यक्ती धामणगाव आवारी येथे आली आहे. झामबिया या देशातून अकोले शहरात एक व्यक्ती आली आहे. तर जर्मनी येथून एक व्यक्ती कोतुळ येथें आली आहे.

परदेशातून हे नागरिक अकोले तालुक्यात आल्याने आरोग्य विभागाने या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या आहेत.

अकोले शहरात अगस्ती कारखाना रोड परिसरात झिम्बोंबे देशातून आलेला व्यक्तीचा मात्र संपर्क होत नाही. अकोल्यात कारखाना रोड परिसरात त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र त्याचे भाऊ व इतर नातेवाईकांकडून त्याची माहिती प्रशासनाला मिळू शकली नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा अद्याप प्रशासनाला शोध लागला नाही.

अकोले शहरातील कारखाना रोड परिसरात त्याच्या वास्तव्याचे ठिकाण असल्याचे समजते. त्याचा भाऊ व त्याचे इतर नातेवाईकांशी संपर्क साधला असता तो अकोल्यात राहत नसल्याचे सांगण्यात आले आहे. सदर व्यक्ती हा बिहारी आहे. प्रशासनाला या नागरिकाचा अद्याप थांगपत्ता लागला नाही.

उंचखडक येथे आलेल्या चारही व्यक्तींच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर कोतुळ व धामणगाव आवारी येथे आलेल्या व्यक्तींच्या शासकीय चाचण्या आज घेण्यात आल्या त्यांचा उद्या अहवाल मिळेल.

उंचखडक येथील येथे आलेल्या चार नागरीकांच्या टेस्ट करण्यात आल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहेत. तरी देखील त्यांना होमकाँरंटाईन केले आहे. काही दिवसानंतर पुन्हा त्यांच्या चाचण्या केल्या जाणार असल्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. शेटे, अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोगरे यांनीं सांगितले.

याबाबत आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार सतीश थिटे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply