Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

तुझा गळा, माझा गळा, गुंफू विकासाच्या माळा

अकोले नगरपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत तीनही उमेदवार एकत्र

अकोले । वीरभूमी - Dec 22, 2021 • 09:58 PM 2709 views
नुकतीच अकोले नगरपंचायतीच्या एकूण 13 प्रभागासाठी मतदान झाले असून सर्व नागरिकांचे लक्ष प्रभाग क्र. 15 मधील अटीतटीच्या झालेल्या लढतीकडे लागले आहे. या ठिकाणी भाजपाचे सचिन शेटे, काँग्रेसचे प्रदीप नाईकवाडी व राष्ट्रवादीचे संतोष नाईकवाडी या तिघांनी प्रभाग क्र. 15 मध्ये एकमेकांविरूढ लढत दिली. ही लढत अतिशय अटीतटीची झाली. यामुळे सर्व अकोलेकरांचे लक्ष या प्रभागाकडे लागले आहे.

भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांमध्ये झालेली लढत अटीतटीची झाली असली तरी या तिघांनी ही लढत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात घेऊन मतदान झाल्यानंतर या तिघांनी एकत्र येऊन फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अपलोड केलेल्या या तिघांच्या फोटोला अनेकांनी लाईक करत अतिशय छान फोटो असे सांगत आहेत. बहुतेक ठिकाणी निवडणुकीत उमेदवार व त्यांचे समर्थक यांच्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादावादी होण्याच्या घटना घडत असतात.

मात्र अकोले नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 15 मध्ये अटीतटीचा तिरंगी सामना असला तरी मतदान होताच या तिघांनी एकमेकांच्या गळ्यात हात टाकून ‘निवडणूक संपली, संघर्षही संपला’ असा संदेश दिला आहे. मतदान संपताच या तिनही उमेदवारांनी ‘मतदार जो कौल देतील त्याचा सन्मान करायचा’ असे ठरविल्याचे या फोटोवरून दिसून येते.

अकोले नगरपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र आमच्या कोणताही वाद नसून मतदारांचा कौल मान्य राहील, असा संदेश दिला आहे. तीन उमेदवारांचा एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून इतर उमेदवारांनाही चांगला संदेश दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply