Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

नादुरुस्त रोहीत्र शेतकर्‍यांच्या ‘माथी’

राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील जोहरवाडीतील प्रकार

करंजी । वीरभूमी - Dec 23, 2021 • 09:48 AM 1019 views
वीज बिल भरण्याच्या नावाखाली महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून शेतकर्‍यांना अक्षरशः फसवले जात आहे. नादुरुस्त रोहीत्रच शेतकर्‍यांच्या हवाली केली जात असल्याचा प्रकार जोहरवाडी येथे घडला आहे. महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांची पिके जळण्याचा आता धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जोहारवाडी हे गाव राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील आहे.

याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथील सावंत वस्ती जवळील फुटवढा येथील रोहीत्र तीन आठवड्यापूर्वी जळाले होते. सदर रोहीत्रावरील लाभार्थी शेतकर्‍यांनी रोहीत्र दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांशी संपर्क केला. त्यावेळी कर्मचार्‍यांनी सदर रोहीत्रावरील शेतकर्‍यांनी थकबाकी भरावी असे शेतकर्‍यांना सांगितले.

शेतकर्‍यांनी तात्काळ एकत्र येत प्रति शेतकरी तीन हजार रुपये व दुरुस्ती खर्च म्हणून स्वतंत्र ज्यादा पैसे जमा केले. थकबाकी भरल्यानंतर महावितरणने रोहीत्र काढून केडगाव येथून दुरुस्त करून आणले. रोहीत्र बसवले 24 तास त्यामधील ऑइल गरम करण्यासाठी चालू ठेवले व त्यानंतर रविवारी रोहीत्र चालू केले. त्यावेळी रोहीत्र खराब असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

पुन्हा दोन दिवसांनी केडगावरून रोहीत्र बदलुन आणले व बसवले. ऑईल गरम केले व चालु केले असता चोविस तासात तिसरे रोहीत्रही खराब झाले. रोहीत्र बसवले आता विज येणार म्हणुन शेतकर्‍यांनी गहु तसेच घास पेरला. तो मात्र आता उगवण्याआधीच जळुन चालला आहे. तर काही उभी पिके जळु लागली आहेत. राज्य उर्जा मंत्र्यांच्या मतदारसंघातच असे प्रकार घडत असल्याबद्दल शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

केडगाव येथे रोहीत्र दुरुस्त करण्यासाठी दिले जात असता दुरुस्त होऊन येण्याऐवजी नादुरुस्त रोहीत्र येतेच कसे? ताब्यात देताना रोहीत्राचे टेस्टिंग होत नाही का? की मुद्दाम शेतकर्‍यांना वेठीस धरण्यासाठी असा प्रकार होतो? शेतकर्‍यांची पिके जळल्यास कोण जबाबदार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply