Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटना

पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा

पुणे । वीरभूमी- May 12, 2022 • 02:24 PM 1508 views
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज यांच्या विचारांना माननार्‍या समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांना संघटित करून त्यांना एका छत्राखाली आणण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापन करत असल्याची घोषणा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करुन दिशा देण्याचे काम केले जाणार आहे. गोर-गरिब जनतेच्या कल्याणासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

काही दिवसापूर्वी राज्यभर केलेल्या दौर्‍या सरम्यान गेल्या 20 वर्षाच्या काळापासून शेतकरी, विद्यार्थी, गोर-गरिब यांचे अनेक प्रश्न समोर आले. ते प्रश्न सोडविण्यासाठी काही निर्णय घेतले, यामुळे मला लोकांचे प्रेम मिळाले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेची खासदारकी दिली. त्या पदाची गरिमा कायम राखत गडकोट किल्ल्यांचे रायगड प्राधिकरणाचे जे काम सुरु आहे ते संपूर्ण देशात कसे सुरु होईल हे पाहिले.

मुंबईत 2017 साली मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता. त्यावेळी स्टेजवर जावून समाजाला शांत करण्याचे काम केले. यावेळी महाविकास आघाडीची बाजू घेतली. यामुळे भाजपला वाटलं असेल की, विरोधाची भूमिका घेत आहे. मात्र मी वेळोवेळी समाजाच्या बाजुनेच भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या खासदारकीचा सहा वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र समाजासाठी जे काम करावयाचे आहे ते अजून बाकी आहे. यासाठी कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष राज्यसभेची खासदारकीची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली.

माझी कार्यपद्धती ही राजकारण विरहीत असून समाजाला दिशा देणारी आहे. यामुळे राज्यातील अपक्ष आमदारांनी मला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply