Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

आघाडी सरकारकडे बहुमत नसल्याचा केला दावा

मुंबई । वीरभूमी - Jun 28, 2022 • 11:06 PM 2019 views
मागील काही दिवसापासून शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकाराचा पाठिंबा काढण्याची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. हे बंडखोर सध्या गुवाहाटीत असून त्यांची संख्या 39 च्या घरात आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यातील आघाडी सरकार अल्पमतात असून लोकप्रतिधीसह सर्व सामान्य नागरिक अडचणीत असून कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली असल्याचे सांगत भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आघाडी सरकारला बहुमत नसल्याचा दावा केला आहे.

या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आ. प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आ. आशिष शेलार आदी भाजपा नेते उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्री आणि सरकारजवळ बहुमत राहिलं नाही, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही असा शिवसेना आमदारांचा पवित्रा आहे, अशा परिस्थितीत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं, असं विनंती करणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. हे पत्र ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष भेटून दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

राज्यपाल यांना दिलेल्या पत्रात राज्याची आत्ताची परिस्थिती मांडण्यात आली आहे. शिवसेनेचे 39 आमदार हे राष्ट्रवादी- काँग्रेस सोबत राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. याचा साधा अर्थ आहे, ते 39 आमदार सरकारसोबत नाहीत. त्यामुळे सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाहीय. सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं, यासाठीचं पत्र राज्यपालांना दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यपाल यांना दिलेल्या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. भाजपा शिष्टमंडळाने दिलेल्या पत्राचा योग्य तो निर्णय राज्यपाल घेतील आणि आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याबाबत सुचना करतील, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply