Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव पोलिसांनी तलाठ्यासह चौघांना जुगार खेळतांना पकडले

शेवगाव पोलिसांनी तलाठ्यासह चौघांना जुगार खेळतांना पकडले

शेवगाव । वीरभूमी- Sep 07, 2022 • 09:42 AM 861 views
शेवगाव येथील सूर्या लॉजवर विनापरवाना तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळतांना एका तलाठ्यास चौघा प्रतिष्ठीतांना ताब्यात घेतले. ही कारवाई शेवगाव पोलिसांनी केली. पोलिसांनी या जुगार्‍यांकडून जुगाराच्या साहीत्यासह 6 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुगार खेळणार्‍यांमध्ये सोपान जनार्धन थोरात (वय 37), अंकुश रमेश पाठक (वय 33), गणेश भीमराज निकम (37) व गणेश गोरख वावरे (वय 33) (सर्व रा. शेवगाव, जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव शहरातील नेवासा रोडलगत असलेल्या सुर्या लॉज येथे काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत असल्याची माहिती शेवगावचे पोनि. विलास पुजारी यांना समजली. त्यांनी सपोनि. रविंद्र बागुल यांना पथकासह संबधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.

यानंतर या ठिकाणी छापा टाकला असता वरील चौघे जण तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळतांना आढळून आले. या चौघांना जुगाराचे साहित्य व 6 हजार 400 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

याबाबत पोकाँ. वासुदेव ठकाजी डमाळे यांच्या फिर्यादीवरुन वरील चौघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जुगार्‍यामध्ये एका तलाठ्याचा समावेश असल्याने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply