Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लंम्पी आजार रोखण्यासाठी राजहंस दूध संघ मोफत लस पुरवठा करणार

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात । सहकारी दूध संघामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी

संगमनेर । वीरभूमी - Sep 11, 2022 • 12:57 AM 836 views
1977 मध्ये तालुक्यात दूध व्यवसायाला सुरुवात झाली. त्यावेळी मोठी जनजागृती करण्यात आली. अनेक दिवसांच्या कष्टातून तालुक्यात दूध व्यवसाय उभा राहिला आहे. या दूध व्यवसायाने व सहकारी दूध संघामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. उत्पादकांनी खाजगीच्या तात्पुरत्या आमिषाला बळी न पडता सहकारी संघाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

राजहंस दूध संघाच्या वतीने लंम्पी या आजाराबाबत तातडीने पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या असून तालुक्यात गायींचे लसीकरण केले आहे. तर आगामी काळात पशुधन वाचवण्यासाठी तालुक्यातील सर्व पशुधनासाठी मोफत लसपुरवठा करण्यात येईल, असे रणजीतसिंह देशमुख यांनी जाहीर केले.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पा. खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीतभाऊ थोरात, बाबासाहेब ओहोळ, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, शंकर पा खेमनर, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, लक्ष्मणराव कुटे,आर.बी. रहाणे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, सौ अर्चनाताई बालोडे, सौ मीराताई शेटे, जिल्हा बँकेचे एमडी रावसाहेब वर्पे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुंबारे आदी उपस्थित होते

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. गुणवत्ता, सात्विकता व प्रामाणिकपणा यामुळे राज्यभरात राजहंस दूध संघाचा लौकिक निर्माण झाला आहे. सुरत, गुलबर्गा, विदर्भ नागपूर, चंद्रपूर अशा अनेक विविध ठिकाणी दूध विक्री होत आहे. वर्षानुवर्षे केलेल्या प्रामाणिक कामातूनही हे यश मिळाले आहे.

मागील दोन वर्ष कोरोना संकटामध्ये शेतकर्‍यांना मोठी मदत या दूध संघाने केली आहे. अशा संकटात संगमनेर तालुका दूध संघ सर्वात पुढे मदतीसाठी होता. यावेळेस खाजगीवाले कुठे दिसत नव्हते. कोरोनात त्यांनी कुठेही मदत केली नाही. आज लंम्पी आजार वाढलेला आहे. अशा काळात किंवा पशुधन वाचवण्यासाठी 75 डॉक्टरांची टीम काम करत आहे. विविध योजना राबवल्या जात आहेत.

या कामांमध्ये खाजगीवाले कुठेही नसतात. मात्र ते एक-दोन रुपयाचे आमीष दाखवतात आणि काही लोक त्याला बळी पडतात. सहकारी संघ टिकला तरच वैभव टिकणार आहे. उत्पादकांना भाव मिळणार आहे. म्हणून तालुक्याच्या व सर्वसामान्यांच्या हिताकरता सहकारी संस्था टिकल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे. याकरता खाजगी सेंटरकडे दूध न टाकता दूध उत्पादकांना मदतीची भूमिका ठेवणार्‍या सहकारी संघाच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सध्या देशात भांडवलदारांचे रक्षण करणारे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी सहकाराची व्यवस्था असून प्रत्येक कार्यकर्त्याने सहकारावर निष्ठा ठेवली पाहिजे. स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे संगमनेरच्या सहकार देशात लौकिकास्पद ठरला आहे. पशुधनाबाबत स्वच्छता ठेवताना प्रत्येक गाईंचा विमा उतरावा असे आवाहन ही त्यांनी केले.

रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, कोरोना काळामध्ये सर्व उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला याला आपला दूध संघ ही अपवाद नाही. त्या काळात दूध संघाने तयार केलेली पावडर स्टॉक होती. या आर्थिक वर्षात त्याची विक्री केली. मात्र उत्पादन खर्च आणि विक्री दरातील तफावत यामुळे त्याचा बोजा या वर्षात पडणार आहे. तसेच कोरोनामुळे विक्रीलाही फटका बसला असून डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढतो आहे. कोरोना संकटामुळे दूध विक्री कमी झाली आहे.

कोरोना संकटाच्या काळात आपण महानंदासाठी सरकारकडून 70 कोटी रुपये मंजूर करून घेतले. दररोज दहा लाख लिटरची पावडर बनवण्यास मंजुरी घेतली. यातून राज्यभरातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यातही सातत्याने पशुधन, त्यांचे आरोग्य याकरता विविध उपक्रम आपण राबवत आहोत. राजहंस संघाचा सरासरीचा दूध भाव हा जास्त आहे. मात्र खाजगीवाले काहीतरी अपप्रचार करतात. ते आपण वेळीच रोखले पाहिजे.

कृत्रिम रेतन, आरोग्याची काळजी याकरता सहकारी दूध संघाने सातत्याने पुढाकार घेतला आहे. नुकत्याच आलेल्या लंम्पी आजाराबाबत तालुक्यात गाईंचे लसीकरण सुरु केले आहे. जनावरांचे मेडिकल, औषधे, प्रयोगशाळा यामधूनही उत्पादकांना मोठा लाभ मिळत असून स्टेट बँकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या योजनेतून 500 शेतकर्‍यांना सुमारे आठ कोटींचे कर्ज वितरण केले आहे. सातत्याने शेतकर्‍यांच्या काळजी करणार्‍या दूध संघाच्या पाठीशी आपण उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी साहेबराव गडाख, मोहनराव करंजकर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, संचालक विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुराडे, बादशाह वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, सौ. प्रतिभाताई जोंधळे, सौ. मंदाताई नवले, फायनान्स मॅनेजर गणपतराव शिंदे, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.

या बैठकीचे प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे यांनी केले नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply