Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लोकनेते बाळासाहेब थोरात गौरव पुरस्काराने 25 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांना जीवनगौरव पुरस्कार

संगमनेर । वीरभूमी- Sep 06, 2022 • 12:16 AM 1127 views
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यासह ठाणे, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात अतिदुर्गम भागात गुणवत्तेने व प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या 25 शिक्षकांचा ‘लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील केबी दादा सभागृहात जाणीव फाउंडेशनच्या वतीने या पुरस्कारांचे वितरण नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जि. प. सदस्य अजय फटांगरे, फादर विल्सन परेरा, प्रा. बाबा खरात, प्राचार्य हरिभाऊ दिघे, शिक्षण अधिकारी सुवर्णा फटांगरे, आदर्श शिक्षक रावसाहेब रोहकले गुरुजी, बबनराव कुर्‍हाडे, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे, उपाध्यक्ष संदीप काकड, समन्वयक अंतोन मिसाळ, अ‍ॅड. अशोक हजारे, जयराम ढेरंगे आदी उपस्थित होते.

यावेळी सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा शिक्षणाचे मोठे केंद्र बनला आहे. या तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमधून काम करणारे शिक्षक आपले काम अत्यंत गुणवत्ते व प्रामाणिकपणाने काम करत आहेत.

नवी पिढी घडवण्यासाठी अनेक नवी आव्हाने आहेत. मात्र सध्याचे शिक्षक ते पूर्णपणे पेलत आहेत. शिक्षण हे समाज बदलवण्याचे प्रभावी माध्यमातून या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचे काम करणार्‍या या गुणवंत शिक्षकांच्या कामाचा जाणीव फाउंडेशनने केलेल्या सन्मान हा शिक्षकांच्या जीवनात नक्कीच मोठी ऊर्जा देणारा ठरणारि आहे.

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लहान मुलांच्या जीवनावर शिक्षकांचा फार मोठा प्रभाव पडत असतो. सध्याचे शिक्षक हे अत्यंत आधुनिक पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नवीन पहाट निर्माण करत आहेत. ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे खर्‍या अर्थाने ईश्वराचे कार्य आहे. संगमनेर तालुक्यात शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या दर्जेदार शैक्षणिक सुविधांबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याची जाणीव जागृती निर्माण करावी, असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी अभिजीत देशमुख (सिन्नर), गणपत हजारे (साकुर), राजेंद्र पाचपुते (खेड, जि. पुणे), बिस्मिल्लाह जैनुद्दीन शेख (संगमनेर), ज्ञानेश्वर सोनवणे (अकोले), डॉ. आतिश कापसे (बोटा), दत्तात्रय जठार (केळेवाडी), वैभव सांगळे (अहमदनगर), स्वप्ना वाघमारे (अहमदनगर), सौ. मालू आभाळे (मुंजेवाडी), सौ. प्रीती पुंजा ठोंबरे (आंबी दुमाला), गणेश कहांडळ (उकडगाव, ता.कोपरगाव), देवेश सांगळे (तळवाडा, शहापूर, जि. ठाणे), सतीश गोरडे (सिन्नर), शिवाजी चत्तर (पळसखेडे),

सोमनाथ घुले (पिंपळगाव माथा), प्राचार्य हरिभाऊ दिघे (तळेगाव दिघे), दत्तात्रय हेंद्रे (राहुरी), चांगदेव काकडे (गागरे वस्ती), दत्तू थिटे (डोळासने), प्रकाश पारखे (सिद्धार्थ विद्यालय), गुलशन जमादार (साकुर), आनंदा मधे (बोटा), सत्यानंद कसाब (वडगाव पान), मच्छिंद्र मंडलिक (निमोण), सौ. सुनीता गडदे (चिपाची ठाकरवाडी), राजू आव्हाड (सुकेवाडी), भाऊसाहेब यादव (ज्ञानमाता विद्यालय), राजेश वाकचौरे (संगमनेर खुर्द) तर प्रा. बाबा खरात यांना आदिवासी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जाणीव फाउंडेशनचे भाऊसाहेब काकड, राजेंद्र गोडगे, रमेश रुपवते, पोपट दिघे, बाळासाहेब मुर्तडक, सुनील अभियेकर, सुधीर गडाख, बाळासाहेब कांडेकर, वसंत बोडखे, अशोकराव साळवे, कुंडलिक मेंढे, बाळासाहेब काकड, हर्षल बाळासाहेब हेंद्रे, निकिता बाळासाहेब हेंद्रे, प्रकाश पारखे, अशोक कांडेकर, सत्यानंद कसाब यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार अशोक कांडेकर यांनी मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply