Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

‘वृद्धेश्वर’ प्रतिटन 81 रुपये एफआरपीचा फरक देणार

आ. मोनिकाताई राजळे यांची घोषणा । वृद्धेश्वर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

पाथर्डी । वीरभूमी - Sep 27, 2022 • 10:51 AM 1753 views
शासनाच्या निर्णयाप्रमाणे एफआरपी दिली जाते. यामध्ये कारखाना प्रशासन व संचालक मंडळ कोणताही बदल करत नाही. वृद्धेश्वरने नेहमीच परिसरातील इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव दिला असून या हंगामात प्रारंभी 2425 रुपये प्रति टनाप्रमाणे एफआरपी एकरकमी दिली होती. आता यामध्ये वाढ होऊन या हंगामातील एफआरपी 2506 रुपये एवढी आली आहे. यामुळे गाळप केलेल्या ऊसाला प्रति टन 81 रुपयाचा फरक दसरा सणानंतर शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल, अशी घोषणा आ. मोनिकाताई राजळे यांनी केली.

पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची 51 वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. यावेळी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना आ. राजळे बोलत होत्या.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष माणिकराव खेडकर, जि. प. सदस्य राहुलदादा राजळे, संचालक उद्धवराव वाघ, सुभाष ताठे, सुभाष बुधवंत, बाळासाहेब गोल्हार, अ‍ॅड. अनिल फलके, साहेबराव सातपुते, शरदराव अकोलकर, डॉ. यशवंतराव गवळी, शेषराव ढाकणे, सिंधुबाई जायभाये, कुशीनाथ बर्डे, कोंडीराम नरोटे, नारायण काकडे, चारुदत्त वाघ, पोपटराव आंधळे, सुभाष बर्डे, जे. आर. पवार, भास्करराव गोरे आदीसह संचालक, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. मोनिका राजळे म्हणाल्या की, वार्षिक सभेमध्ये सभासदांनी मांडलेल्या सुचनांचे पालन केले जाईल. मागील वर्षीच्या गाळप हंगामात ऊस तोडणीसाठी उशिर झाल्याने कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र शेवगाव-पाथर्डी तालुक्यताल पाटपाण्याचा भाग वगळता इतर भाग आजही दुष्काळी आहे. मगील हंगामात तीन लाख मेट्रिक टन ऊस अतिरिक्त होता.

मात्र या हंगामात कारखाना मशनरीमध्ये बदल केल्याने हा हंगाम यशस्वी पार पडला. ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांच्या लेखी तक्रारी आल्या आहेत. त्यांना मजुरांनी घेतलेली रक्कम देण्यात येईल, असा दिलासा दिला.

आ. राजळे म्हणाल्या की, अल्पमुदत कर्जाला उशिर झाल्याने इथेनॉल प्रकल्पाची वाढीव सुधारीत किंमत झाली आहे. इथेनॉलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही प्रति टन 125 रुपये प्रमाणे ठेव म्हणुन रक्कम कपात केली जाणार आहे. या रक्कमेला 9 टक्के दराने व्याजही दिले जात आहे.

गाळप हंगाम सुरु करण्यासाठी एफआरपीची रक्कम पूर्ण करणे गरजेचे आहे. कारखान्याची क्षमता एक हजार मेट्रिक टनाने वाढली पाहिजे. मात्र त्यासाठी भागभांडवल, स्वनिधी उभारावा लागेल. मात्र हे करतांना ‘अंथरुण पाहुन पाय पसरावे लागतात’. असा टोलाही लगावला.

आ. राजळे म्हणाल्या की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी संचालक मंडळावर जो विश्वास टाकला आहे त्याला तडा जावू दिला जाणार नाही. ऊस क्षेत्र वाढले मात्र गाळप क्षमता मॅच होत नाही. शेतकर्‍यांचा ऊस वेळेवर गाळप होण्यासाठी कारखाना प्रशासन व संचालक मंडळाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास आ. राजळे यांनी व्यक्त केला.

सभेचे प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक आर. जे. महाजन यांनी केले. ताळेबंद, अहवालाचे वाचन संभाजी राजळे यांनी केले. सूत्रसंचालन आर. बी. शेख यांनी केले तर संचालक श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply