Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

इथेनॉल उत्पादनामुळे सुत्र बदलून एफ. आर. पी.मध्ये वाढ करावी

मा. खा. राजू शेट्टी यांची कृषी मुल्य आयोगाकडे मागणी

पुणे । वीरभूमी - Nov 09, 2022 • 09:25 PM 1117 views
इथेनॉलचे उत्पन्न रंगराजन शिफारशीनुसार उत्पन्नात ग्रहीत धरावे. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने एफ. आर. पी. चे सुत्र बदलून एफ. आर. पी. मध्ये वाढ करावी, अशी मागणी स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांनी कृषी मुल्य आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत स्वाभिमानीचे मा. खा. राजू शेट्टी यांनी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफ. आर. पी. नुसार दर देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. मात्र केंद्र सरकारने हा निर्णय घेतला त्यावेळी ऊसापासून मिळणार्‍या उपपदार्थात इथेनॉलचे धोरण अस्तित्वात नव्हते.

यामुळे साखर कारखान्यात तयार होणार्‍या इथेनॅालचे उत्पादन ग्रहीत न धरल्याने सध्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने एफ. आर. पी.चे सूत्र बदलावे.

केंद्र सरकारने ऊस उत्पादकांना ऊस दर देण्यासाठी ठरवलेले एफ. आर. पी. सुत्रात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. या सुत्रात बदल करुन साखर कारखान्यातील उपपदार्थ इथेनॉल उत्पन्न पकडून एफ. आर. पी. मध्ये वाढ करावी.

यासाठी इथेनॅालचे उत्पन्न रंगराजन शिफारशीनुसारच्या उत्पन्नात पकडून एफ. आर. पी. द्यावी. यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, अशी मागणी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पॅाल शर्मा यांचेकडे केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply