Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बोधेगावात वंचितचा रास्तारोको

मागणी मान्य न झाल्यास 26 जानेवारीला सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा

शेवगाव । वीरभूमी- Dec 21, 2022 • 04:09 PM 1409 views

पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावरील जमीन संपादित शेतकर्‍यांना मोबदला मिळावा. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

हा प्रश्न मार्गी न लागल्यास दि. 26 जानेवारी रोजी शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील, असा  इशारा वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी दिला.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, मुंगी, हातगाव, लाडजळगाव, शेकटे खुर्द या गावातून पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे गेल्या पाच सहा वर्षांपासून काम सुरू आहे. परंतु रस्त्यासाठी जमीन संपादित केल्यानंतरही शेतकर्‍यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. यामुळे संबधित शेतकर्‍यांनी मोबदला मिळावा यासाठी महामार्गाचे काम बंद पाडले आहे.

संबंधित ठेकेदार व अधिकारी हे प्रशासनला हाती घेऊन कामात अडथळा  आणनार्‍या शेतकर्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत आहेत. प्रशासनाची ही मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.

अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची मिलिभगत असून या प्रश्नावर कोणी बोलत नाही, असा आरोप आंदोलकानी केला. हा प्रश्न मार्गी न लागल्यास लोकप्रतिनीला या परिसरात फिरकू देणार नाही व दि. 26 जानेवारी 2023 रोजी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्यासह महिला आघाडी तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, बन्नोभाई शेख, प्यारेलाल शेख, माजी सरपंच रामजी अंधारे, अशोक लाड, डॉ. निलेश मंत्री, धोंडीराम मासळकर, अरविंद सोनटक्के, आदित्य मोरे, गंगाभिषण घोरतळे, फारूक सय्यद, चांद शेख, बबन सय्यद, कारभारी नरोटे, किशोर मातंग, ईश्वर मोरे, राजेंद्र बनसोडे, अरविंद सोनटक्के, निलेश ढाकणे, गौतम भोंगळे यांच्यासह या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आंदोलकांनी खासदार, आमदार यांच्या विरोधी घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply