Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

सरकारने विकास कामांना स्थगिती देणे दुर्दैवी

आ. बाळासाहेब थोरात । पाठपुरावा करून स्थगिती उठवल्याने विकास कामे पूर्ववत सुरू

 संगमनेर । वीरभूमी - Jul 23, 2023 • 01:12 PM 1163 views

भाजपा हा धर्माच्या नावावर राजकारण करत असून शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी हा पक्ष त्यांनी फोडला आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य झालेले नाही. राज्यघटना व लोकशाहीवर विश्वास असलेल्या काँग्रेस पक्षाला आगामी काळ चांगला आहे. फक्त राजकारणासाठी मंजूर झालेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती. मात्र याबाबत विधानसभेत आवाज उठवल्याने पुन्हा विकास कामे सुरू झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या रणखामवाडी ते कुंभारवाडी वरवंडी व दरेवाडी ते कवठे मलकापूर या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, जि. प. सदस्य अजय फटांगरे, इंद्रजीत खेमनर, तुकाराम दातीर, पांडुरंग दातीर, माधव दातीर, भाऊसाहेब डोलनर ,अण्णासाहेब कुदनर, जयराम ढेरंगे, गणेश सुपेकर, सुदाम सागर, बाबाजी गुळवे, हौशीराम खेमनर, पुष्पाताई गुळवे, राहुल गंभीरे आदींसह पठार भागातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार थोरात यांच्या हस्ते 16 कोटी 8 लाख रुपये निधीच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

आमदार थोरात म्हणाले की, मविआ सरकारच्या काळामध्ये आपण तालुक्यातील विविध रस्त्यांसह पठार भागातील अनेक रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र सरकार बदलले आणि नव्या सरकारने मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली. या स्थगीतीबाबत आपण सातत्याने आवाज उठवल्याने सरकारने आताही स्थगिती उठवली आहे. आपण कायम विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्याने सत्ताधारी व विरोधातील मंत्रीही आपला सन्मान करतात. त्याला फक्त काही अपवाद आहेत. शासकीय अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना या विकास कामांसाठी येण्याचे बंधन घालने चुकीचे आहे.

भाजप हा धर्माच्या नावावर राजकारण करत असून त्यांचे फोडाफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही. वाढलेली बेरोजगारी, महागाई यावर जनता नाराज असून मणिपूरमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत वेदनादायी आहे. देशात अस्थिर वातावरण असून आगामी काळा हा काँग्रेसचाच राहणार आहे.

संगमनेर तालुका हा विकासातून पुढे जात असून सर्व सहकारी, शैक्षणिक संस्था व सातत्याने होत असलेली विकास कामे यामुळे संगमनेर तालुका हा इतरांसाठी आदर्शवत ठरला आहे. 171 गावे व 258 वाड्यावस्त्या असलेल्या तालुक्याचा विस्तार मोठा असून प्रत्येक गावात विकास कामे राबवली जात असल्याचेही आमदार थोरात म्हणाले.

शंकर खेमनर म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भागात 15 कोटींच्या रस्त्याला मंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रणखांब ते खांबा हा पहिला कामाचा टप्पा सुरू होत असून या परिसरात अनेक विकास कामे आमदार थोरात यांच्या पुढाकारातून राबवली जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर विधानसभेत आमदार थोरात यांनी विद्यमान सरकारला घेतल्यानंतर या सरकारची मोठी भंबेरी उडाली असल्याची ते म्हणाले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply