Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

चांगले काम करणार्‍या हर्षदा काकडे यांना विधानसभेत पाठवा

सिने अभिनेते मकरंद अनासपुरे । शेवगावात जनशक्ती विकास आघाडीचा ‘वज्र निर्धार मेळावा’

शेवगाव । वीरभूमी - Sep 06, 2024 • 09:39 AM 1354 views

आजचा काळ कठिण काळ आहे. आपले विचार माणसाला घडवत असतात आणि बिघडवत असतात. अ‍ॅड. शिवाजीराव काकडे व हर्षदाताई काकडे यांनी नेहमी चांगले काम केले आहे. चांगले काम करत असतांना नेहमी टीका होत असते.  आता जनतेलाही टक्केवारीची भाषा कळायला लागली आहे. जनतेनेही मतदानाची टक्केवारी वाढवून चांगली  कामे करणार्‍या हर्षदा काकडे यांना विधानसभेत पाठवले तर भविष्यातही चांगली विकासकामे होतील. हर्षदाताई काकडे यांच्या राजकीय वाटचालीला निसर्गानेही पावसाच्या रुपात सदिच्छा दिल्या असल्याचे मत सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.

शेवगाव शहरातील खंडोबा मैदानावर सौ. हर्षदा काकडे यांच्या समर्थनार्थ जनशक्ती विकास आघाडीच्यावतीने ‘वज्र निर्धार’ मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. प्रारंभी ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. 2 मधील लढवय्या शेतकर्‍यांचा प्राथमिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. तसेच ‘जिंकूनी आणले पाणी’ या फिल्मचा आणि ‘पाऊले सामर्थ्याची’ या सौ. काकडे यांच्या कार्यपुस्तकाचे प्रकाशन मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, ह.भ.प. नारायण महाराज गर्जे, ह.भ.प. मीनाताई मडके, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बटुळे, माजी जि. प. सदस्य पवनकुमार साळवे, रामभाऊ साळवे, गोरक्ष कर्डिले, भाऊसाहेब बोडखे, विनोद मोहिते, सरपंच वैभव पुरनाळे, अनिल साबळे, सुनील गरुड, सुभाष सबनीस, अशोक ढाकणे, अल्ताफ शेख, बाळासाहेब कचरे, विनायक काटे, नवनाथ फुंदे, सुनील दारकुंडे, सुनील काटे, नारायण टेकाळे, भाऊसाहेब मडके, रामराजे लाखे, अ‍ॅड.संजय काकडे, भारत लांडे, रज्जाक शेख, देविदास गिर्‍हे, संतोष राठोड, धाराभाऊ राठोड, राधाकिसन शिंदे, माणिक गर्जे, भगवान डावरे आदी उपस्थित होते.

यावेळी अनासपुरे म्हणाले की, काकडे यांचा पाण्यासाठीचा संघर्ष वडिलांपासूनचा आहे. हर्षदा काकडे या कोणताही प्रश्न हाती घेतला तर सोडवल्याशिवाय हटत नाहीत. कोणतेही मोठे पद नसताना लढत राहणे हे सोपं काम नसतं. काकडे दांपत्यांनी कोविडकाळामध्ये शाळा मोकळी करुन उभारलेली दोन कोविड सेंटर, गोरगरिबांच्या मुलांसाठीचे वसतीगृह, ताजनापूर लिफ्टसाठीचा लढा, खरोखरच कौतुकास्पद असा आहे. ही माणसं चांगली आहेत म्हणून त्यांना यावेळी साथ द्या व सौ. हर्षदा काकडे यांना विधानसभेत पाठवा असेही अनासपुरे म्हणाले.

सौ. हर्षदा काकडे म्हणाल्या की, प्रस्थापित पुढार्‍यांनी आलटून पालटून आत्तापर्यंत सत्ता भोगल्या आहेत. सत्तेचा उपभोग त्यांनी फक्त आपला कारखाना वाचवणे व स्वहित साधने एवढाच केला आहे. सर्व सत्ता त्यांना त्यांच्याच घरात लागतात. जिल्हा बँक, पंचायत समिती, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, आमदारकी या सर्व सत्ता यांच्याकडेच आहेत मग यांना विकास का करता आला नाही. फक्त टक्केवारीसाठी यांना पदे लागतात. आणि आता हेच परिवर्तन यात्रा घेऊन फिरताहेत. प्रत्येक पक्ष यांनी वाटून घेतलेले आहेत. दहा मिनिटात हे पक्ष बदलतात. आमचे मिळालेले तिकीट आर्थिक बाजार करून यांनी चोरून नेले असे यांचे काम चालू आहे. यांना आता सर्वसामान्य जनताच पालथ करणार आहे. आता कुठल्याही परिस्थितीत मी तुमच्या सर्वसामान्यांचे बळावर विधानसभा गाठणार आहे. प्रस्थापित पुढार्‍यांनी 50 वर्षात केला नाही एवढा विकास करणार आहे. कुणाच्या दबावाला घाबरू नका. ध्यानात ठेवा मी आता माघार घेणार नाही. पक्षाकडे मागणी केली आहे जर पक्षाने तिकीट दिले तर दिले नाहीतर तुमच्या जीवावर निवडणूक लढवणार व जिंकूनही येणार, असा विश्वासही सौ. काकडे यांनी व्यक्त केला.

अ‍ॅड. शिवाजीराव काकडे म्हणाले, मतदारसंघातील तिन्ही कारखानदारांना जनतेने आलटूनपालटून सत्ता दिली. मात्र याकाळात तुम्हाला काहीही मिळाले नाही. आता यावेळी चुकलात तर पुढील काळात तुम्हाला त्यांच्या मुलांचा, नातवांचा करावा लागेल. या निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच बडे नेते विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी लढत होणार असून सामान्य माणुस जिंकणार आहे. सोयरे धायरे, मित्र मंडळीनी सर्व पक्ष मांडीखाली दाबवले असून या आयत्या लोण्यावर बसलेल्या बोक्यांना शेतकरी, कामगार व सामान्य जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा देत जायकवाडी धरणातील हक्काचे 3.8 टीएमसी पाणी आपल्या शेतात आणण्यासाठी, एमआयडीसीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शेतमजूर, शेतकरी, बांधकाम कामगार यांचे भविष्य घडविण्यासाठी हर्षदा काकडेंना साथ देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड व गोविंद वाणी यांनी केले तर जगन्नाथ गावडे यांनी आभार मानले.

नाम फाउंडेशनला 25 हजाराची आर्थीक मदत.

स्व. टी. के. पुरनाळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी मंदाकिनी पुरनाळे यांच्याकडून ‘नाम’ फाउंडेशनला आर्थीक मदत म्हणुन 25 हजार रुपयांचा धनादेश अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply