Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर

या गणाला मिळाला सभापतीपदाचा मान

पाथर्डी । वीरभूमी- Oct 13, 2025 • 01:04 PM 1798 views
नुकतेच पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज सोमवारी तहसील कार्यालयात गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. सभापतीपदी अनुसूचित जाती महिला राखीव झाल्यानंतर हे आरक्षण कोणत्या गणासाठी निघते याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अखेर आज झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये कासार पिंपळगाव गणाला सभापतीपदाचा मान मिळाला आहे.

पाथर्डी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुका पंचायत समितीच्या 10 गणांसाठी आरक्षण सोडत झाली. यामध्ये (कंसात आरक्षण) पुढील प्रमाणे कासार पिंपळगाव गण ः (अनुसूचित जाती, महीला राखीव), तिसगाव गण ः (नागरिकांचा मागास प्रवर्ग, महीला राखीव), माळी बाभुळगाव गण ः (नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला), माणिकदौंडी गण ः (सर्वसाधारण, महिला), मिरी गण ः (सर्वसाधारण, खुला), टाकळी मानुर गण ः (सर्वसाधारण, महीला), करंजी गण ः (सर्वसाधारण, महीला), अकोला गण ः (सर्वसाधारण, खुला), कोरडगाव गण ः (सर्वसाधारण, खुला), भालगाव गण ः (सर्वसाधारण, खुला) असे आरक्षण निघाले.

तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत लहान मुलगी युगंधरा गर्जे हीच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, रविंद्र शेकटकर, दादासाहेब वावरे आदी अधिकारी व विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply