Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजना गुंडाळली

कृषी आयुक्तांचे जिल्हा कृषी अधिकारी यांना आदेश

अहमदनगर । वीरभूमी - May 08, 2020 • 12:00 AM 5502 views
वाटर बँक म्हणुन शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजना कृषी विभागाने गुंडाळली आहे. तसेच रोहयो व जलसंधारण कार्यक्रमातंर्गत योजनांसाठी 2020-2021 अर्थसंकल्पिय निधीच्या केवळ 33 टक्के निधी उपलब्ध होणार असल्याने यापुढे ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या नवीन कामे व नवीन आखणी करू नये आणि नवीन काम सुरू करू नये, असे निर्देश कृषी आयुक्तालयाने जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहेत.

याबाबत रोहयो व जलसंधारण विभागाचे सचिव यांनी पुणे विभागिय कृषी आयुक्त यांना दुरध्वनीद्वारे सुचना दिल्यानंतर आयुक्तालयाने कृषी अधिकारी यांना आदेश काढले आहेत.

रोहयो व जलसंधारण विभागाने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकर्‍याला टंचाईच्या काळात पाणी टंचाईची झळ कमी प्रमाणात बसत होती. या योजनेअंतर्गत शेकडो शेततळे निर्माण झाल्याने शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी फळ पिक लागवडीकडे वळाला होता. शेततळ्यातील पाण्याचा वापर अनेक शेतकरी ‘वाटर बँक’ म्हणुन करत आहेत. मात्र यापुढे निधीच उपलब्ध होणार नसल्याने शेतकर्‍यांना योजनेच्या लाभाला मुकावे लागणार आहे. यामुळे शेतकर्‍यांमधून नाराजीचा सुर निघत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply