Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बोधेगावात मुसळधार. पाच तास ट्रॉफिक जाम..

पिकात पाणी, शेतकरी आर्थिक संकटात.

बोधेगाव- वीरभुमी Oct 12, 2020 • 12:00 AM 931 views
सौभाग्याचं लेन गहाण ठेवून काळ्या आईची कुस उजवली पिक देखील जोमात आलं परंतु हातातोंडाशी आलेला घास सलग पाच तास पडत आसलेल्या मुसळधार पावसाने हिरावून घेतला आहे. पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बोधेगाव सह परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. आज बोधेगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने येथील पाताळ गंगेला मोठा पुर आला होता त्यामुळे शेवगांव - गेवराई हा राज्य मार्ग तब्बल पाच तास बंद होता या कालावधीत दोन ते तीन किमी च्या लांबच लांब रांगा याठिकाणी लागल्या होत्या.दरम्यान मागील वर्षी वातावरणातील बदलाने कपाशीवर बोंड आळी तर दिवाळी दरम्यान महिनाभर पडत आसलेल्या पावसाने बाजरीला व ईतर धानाला मोड आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. तर यंदा वातावरण आणि पावसाचे प्रमाण सुरुवातीला चांगले राहिल्याने पिकाचा जोम आणि वाढ चांगली राहिली उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पिकासाठी औषधाची फवारणी आणि रासायनिक खतावर खर्च केला परंतु एन कापूस वेचणीच्या दरम्यान पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने हातातोंडाशी आलेला घास नियतीने पुन्हा हिरावून घेतला आहे. सध्या कपाशी तुर कांदे सोयाबीन या पिकात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आसुन कापसासह ईतर पिक देखील संकटात सापडली आहेत. जानकारांच्या मते पिकाना पाणी जास्त झाल्यास त्याची ॲक्सिजन घेण्याची क्षमता कमी होउन मुळ्या सडल्या जातात परिणामी पि पिकाची वाढ खुटुन झाडे निकामी होतात. दरम्यान परतीच्या पावसा आगोदर पडलेला आणि आता परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणात बरसल्याने शेतात उभ्या आसलेल्या कपाशी पिकांच्या दोड्या काळया पडण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी फुटलेला कापुस देखील शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत मातीत मिसळत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत खात्यावर वर्ग करण्याची मागणी बोधेगाव सह कांबी, हातगाव, मुंगी, बालमटाकळी, लाडजळगाव, आधोडी, दिवटे, शोभानगर, चेडेचांदगाव भागातील शेतकरी तसेच डॉ क्षितिज भैय्या घुले युवा मंच बोधेगाव परिसर तसेच माऊली प्रतिष्ठानचे आध्यक्ष सचिन घोरतळे यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply