Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

ट्रान्सफार्मर बदलण्याची जबाबदारी ही महावितरणची

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आदेश; राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा

करंजी । वीरभूमी - Nov 02, 2020 • 12:00 AM 3575 views
ट्रान्सफार्मर बदलण्याची जबाबदारी ही महावितरणची आहे. त्याची वाहतूक शेतकऱ्यांनी करायची नाही, असे स्पष्ट आदेश उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ना. तनपुरे यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ना. तनपुरे यांनी ग्रामस्थांच्या शेकडो समस्या जागेवरच सोडवल्या. यावेळी तनपुरे यांनी हे आदेश दिले.

ना. तनपुरे म्हणाले की, बिघाड झालेला ट्रान्सफार्मर किंवा जळालेला ट्रान्सफार्मर महावितरण विभागानेच काढून घ्यायचा आहे. त्याची वाहतूक करून तो दुरुस्त करून आणून त्याची सर्व जबाबदारी बसवून देण्यापर्यंत महावितरणनेच करावयाची आहे. शेतकरी याबाबत कोणतीही वाहतूक करणार नाहीत. याबाबत शेतकरी बांधवांनी बिनधास्त रहावे. तसेच महावितरणने तातडीने ट्रान्सफार्मर बदलावा. अन्यथा शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहन ना. तनपुरे यांनी केले.

मिरी व शिंगवे येथे जनता दरबारामध्ये ग्रामस्थांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात आली. रस्ते वीज व पाणी या प्रमुख विषयासह इतरही ग्रामस्थांनी अनेक समस्या मांडल्या. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या समक्ष ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. त्यामुळे हा दरबार यशस्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे शासकीय निधी मध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली. सध्या आमदार निधीही देण्यात अडचण येत आहे. त्यामुळेच रस्त्यांच्या निधीचे बिडीओ कडूनच नियोजन करण्यात येत आहे. महावितरणच्या बाबतीत बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की, बहुतेक ठिकाणचे ट्रान्सफार्मर बदलण्याची गरज आहे. मागील काही वर्षात सत्ताधाऱ्यांनी विज क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक ठिकाणचे ट्रांसफार्मर हे खराब झाले आहेत. त्यामुळे खराब झालेल्या ठिकाणचे ट्रान्सफर बदलण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. गावठाण डीपी बाबत तातडीने निर्णय घेवुन तेथील ट्रान्सफार्मर बदलण्यात येतील.

वांबोरी चारीचे पाणी या भागात कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी तनपुरे यांनी दिली. तनपुरे म्हणाले की, सध्या मुळा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यापूर्वीच संबंधित विभागांशी संपर्क करून धरण ओव्हरफ्लो झाल्याबरोबर वांबोरी चारीला पाणी सोडणे सुरू केले. त्यामुळे या भागातील सुमारे ३९ गावांमधील शंभर तलाव वांबोरी चारीने शंभर टक्के भरले आहेत. आता सोडलेले पाणी हे कोणत्याही हिशोबात धरलेले नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे ६८० एम सीएफटी पाणी धरणात तसेच शिल्लक आहे. वेळेनुसार भविष्यकाळात काही महिन्याने पुन्हा आपण हे आपले हक्काचे पाणी पुन्हा एकदा सोडून आपल्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करणार असल्याचे तनपुरे यांनी यावेळी सांगितले.

जनता दरबारामध्ये कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून हा जनता दरबार भरवण्यात आला. मास्क काढू नका, सुरक्षित अंतर ठेवा, कोरोना बाबत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण भविष्यात पुन्हा ही लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घ्यावी, असे आवाहन तनपुरे यांनी केले.

या कार्यक्रमावेळी पंचायत समीती सदस्य राहुल गवळी, सरपंच अमोल वाघ, जालींदर वामन, सुभाष गवळी, राजू तागड, राजुभाई दारूवाले, रंजीत भैया आदीसह गटविकास अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply