Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

मुलीच्या छेडछाडीला विरोध करणार्या माजी पंचायत समिती सभापतीच्या कुटुंबाला मारहाण

१२ तरुणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

श्रीगोंदा । वीरभूमी- Nov 29, 2020 • 12:00 AM 5245 views
अल्पवयीन मुलीची छेडछाड करताना रोखल्यामूळे आरोपी तरुणांनी चिडून श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सभापती शहाजी हिरवे यांच्या घरावर हल्ला चढवला व त्यांच्या पत्नीसह इतर महिलांना मारहाण करून घरातील रोख रकमेसह गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले असल्याची खळबळजनक घटना शनिवार दि. २९ रोजी सकाळी ९:४५ ते १०:०० वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मनीषा शहाजी हिरवे यांच्या फिर्यादीवरून १२ जणांवर विनयभंग, मारहाण व रोख रकमेसह सोने लुटीचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या घराजवळ एक गरीब कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला गुंड प्रवृत्तीचे तरुण छेडछाड करून त्रास देत होते. यामुळे फिर्यादीच्या मुलाने व इतर मुलांनी या तरुणांना समज देण्याचा प्रयत्न दोन दिवसांपूर्वी केला होता. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली होती.

फिर्यादीत मनीषा हिरवे यांनी म्हटले आहे की, या घटनेचा राग येऊन विजय पांडुरंग कुसाळकर, पांडुरंग बाळू कुसाळकर, रोहित जालिंदर कुसाळकर, विलास भोजू कुसाळकर, जालिंदर सखाराम कुसाळकर, रवी लालासाहेब कुसाळकर, नितीन बाबासाहेब कुसाळकर, योगेश बाबासाहेब कुसाळकर, मुका (नाव माहीत नाही), बाबासाहेब कुसाळकर, भरत कुसाळकर, सुरज कुसाळकर (सर्व रा. वडारवस्ती, पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) आणि पप्पू लष्करे (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) हे आमच्या घरी अचानक मोटारसायकलवरून आले व तुमचा मुलगा अनिकेत कोठे आहे असे त्यांनी विचारले असता, घरी कोणीच नाही असे सांगितल्याचा राग येऊन त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत दमदाटी करू लागले. त्यातील विजय पांडुरंग कुसाळकर व इतर दोन जण आमच्या घरात शिरून मुलगा अनिकेत आहे का ? पाहू लागले. त्याचवेळी मी त्यांना घरात शिरण्यास प्रतिबंध केला असता त्यांनी मला धक्काबुक्की केली. यातील विजय पांडुरंग कुसाळकर याने माझ्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे रुपये ७० हजार रुपयांचे गंठन तोडून नेले व कपाटात ठेवलेले पन्नास हजार रुपये काढून नेले आहेत. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आहे.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी आमच्या वस्तीवरून पारगाव गावात येत असताना गणपती मळा येथील आजारी असलेले वयोवृद्ध किसन अर्जुन हिरवे यांच्या घरी जाऊन तुमचा नातू प्रमोद कुठे गेला? असे विचारून त्यांना मारहाण सुरु केली व आमच्या नादी लागले तर एकएकाला जीवे मारण्याची धमकी दिली व ते सर्वजण मोटारसायकलवरून गावातून जोरात हॉर्न वाजवत व मोठयाने ओरडत दहशत निर्माण करून गेले आहेत. असे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास मुख्य पोलीस हवालदार विठ्ठल बडे करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply