Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध

कोपरगाव शहरातील विस्थापितांना न्याय मिळावा हीच आमची भावना : दत्ता काले

कोपरगाव शहरातील विस्थापितांना न्याय मिळावा हीच आमची भावना : दत्ता काले

कोपरगाव । वीरभूमी - Nov 29, 2020 • 12:00 AM 1000 views
कोपरगाव शहरातील विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांना गेल्या दहा वर्षापासुन न्याय मिळालेला नाही, याप्रश्नी वारंवार निवेदन देउनही प्रश्न मार्गी लागत नाही, म्हणून कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या आंदोलनास पाठींबा आहेतच विस्थापितांना न्याय मिळावा हीच आमची भावना असल्याचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी पञकारांशी बोलतांना सांगितले.

दत्ता काले बोलतांना म्हणाले की, सुमारे दहा वर्षापुर्वी शहरातील अतिक्रमण काढण्यात आले, यामध्ये अनेक छोटे व्यावसायिक विस्थापित झाले,त्यामुळे अनेक कुटूंबाची उपासमार झाली, तर अनेक कुटूंबे उध्दवस्त झाली. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी वारंवार बैठका घेउन पाठपुरावा केला.

त्याप्रमाणे नगरपरिषदेच्या १५ एप्रिल२०१७ रोजी सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठरावही मंजुर करण्यात आला. तसेच यापुर्वी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब, मा.बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन नगराध्यक्ष सुरेखा राक्षे यांच्या कार्यकाळात नगररचना विभागास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार प्रधानसचिव यांच्या अभिप्रायानुसार नेमून दिलेल्या जागेवर खोकाशाॕप करणेस सुचविले होते. परंतु आज अतिक्रमण अनेक दिवस उलटूनही नगरपरिषद विस्थापितांना खोकाशाॕप देउ शकली नाही. त्यामुळे विस्थापिंताचे मोठया प्रमाणात हाल झाले. अनेकांना आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला, त्यात सध्याच्या कोरोना महामारीमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली. छोटे छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटूंबावर मोलमजुरी करण्याची वेळ आली. तरीही पालिका या प्रश्नी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने आंदोलन हाती घेतलेल्या आंदोलन जो पर्यंत हा प्रश्न तडीस जात नाही, तोपर्यंत या आंदोलनात कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टी कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीच्या सोबत असल्याचे श्री काले यांनी जाहीर केले.

काले पुढे म्हणाले की, खोका शाॕप प्रश्न बाबत काहींनी खोटेनाटे वावडे उठवल्याने छोटेमोठे व्यापारी संभ्रमात आहेत. विस्थापितांच्या प्रश्नांवर राजकारण करु नये असा सल्ला देखील दत्ता काले यांनी दिला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply