Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्हा बँकेत 4 जागांमुळे सहमती एक्सप्रेसला ब्रेक

जिल्हा बँकेत 4 जागांमुळे सहमती एक्सप्रेसला ब्रेक

अहमदनगर । वीरभूमी- Feb 11, 2021 • 12:00 AM 2946 views
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. मात्र बँक निवडणुक 4 जागांमुळे बिनविरोध होऊ शकली नाही. यामुळे जिल्हा बँकेतील सहमती एक्सप्रेसला 4 जागांनी ब्रेक लावला आहे तर बँकेच्या तब्बल 17 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

जिल्हा बँकेसाठी आज उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय हालचाली होऊन बँकेच्या तब्बल 17 जागा बिनविरोध झाल्या. मात्र 4 जागा बिनविरोध करण्यात सहमती एक्सप्रेसला ब्रेक लागला. यामुळे जिल्हा बँकेसाठी आता सेवा सोसायटी मतदार संघातील नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती मतदार संघ अशा 4 जागांसाठी दि. 20 फेब्रुवारीला मतदान होत आहे.

बिनविरोध निवड झालेल्या जागा पुढील प्रमाणे- सेवा सोसायटी मतदार संघ- नेवासा- शंकरराव गडाख, अकोले- सीताराम गायकर, कोपरगाव- विवेक कोल्हे, जामखेड- अमोल राळेभात, शेवगाव- चंद्रशेखर घुले, पाथर्डी- मोनिका राजळे, राहाता- अण्णासाहेब म्हस्के, राहुरी- अरुण तनपुरे, श्रीगोंदा- राहुल जगताप, श्रीरामपूर- भानुदास मुरकुटे, संगमनेर- माधवराव कानवडे.

अनुसुचित जाती मतदारसंघ- अमीत भांगरे, इतर मागासवर्ग मतदारसंघ- करण ससाणे, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ- गणपतराव सांगळे, शेती पुरक प्रक्रीया मतदारसंघ- आशुतोष काळे, महिला प्रतिनिधी मतदारसंघ- अनुराधा नागवडे, आशा तापकीर असे 17 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, माजी आ. वैभव पिचड, माजी आ. पांडुरंग अभंग या दिग्गजासह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply