Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद; लग्न समारंभासाठीही लागणार पूर्वपरवानगी

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश । आठवडे बाजार 29 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत बंद

अहमदनगर । वीरभूमी- Mar 26, 2021 • 12:00 AM 4187 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यक्रम, समारंभानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार दिनांक 29 मार्चपासून ते 15 एप्रिल, 2021 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात विवाह समारंभास जास्तीत जास्त 50 व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी आहे. मात्र, लग्न समारंभ असलेले मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल, आणि इतर समारंभाचे ठिकाणी 50 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीउपस्थित राहणे, सोशल डिस्टंन्सिंग, गर्दीचे व्यवस्थापन, समारंभ ठिकाणचे निर्जतुकीकरण, उपस्थित व्यक्तींसाठी सॅनिटायझरची व्यवस्था, ऑक्सीमीटरची व्यवस्था या व अन्य कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणार्या मंगल कार्यालयांना 10 हजार रुपये दंड करण्यात येत आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी आता लग्न समारंभ, साखरपुडा या सारख्या धार्मिक समारंभ आयोजनास आता संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

याशिवाय, नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार आता 29 मार्चपासून ते 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply