Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

गोदावरी डाव्या उजव्या कालव्याचे या दिवसापासून आवर्तन

डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला 13.5 कोटी निधी मंजूर : आमदार आशुतोष काळे

कोपरगाव।वीरभूमी- Apr 06, 2021 • 12:00 AM 1293 views
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दोन उन्हाळी आवर्तन देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या झालेल्या बैठकीत गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला 13 एप्रिलपासून एकाचवेळी दोनही उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

तसेच शंभरी पार केलेल्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी जलसंपदामंत्री ना.जयंतरावजी पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील 13 कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व बाजूस कोणत्याही प्रकारचे बंधारे न बांधणेबाबत जलसंपदा विभागाने काढलेला आदेश शिथिल करणेबाबत व कोपरगाव तालुक्यात बंधारे बांधण्यास परवानगी मिळणेबाबत विचारविनिमय करणेबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी डाव्या उजव्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सिंचनासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली. सदर मागणीचा विचार करून 13 एप्रिलपासून डाव्या व उजव्या कालव्याला एकाचवेळी दोनही उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन्ही उन्हाळी आवर्तन एकाचवेळी सोडण्यात येणार असल्यामुळे 15 जूनपर्यंत डावा व उजवा कालवा वाहणार असून त्याचा फायदा लाभक्षेत्रातील शेती सिंचनाबरोबरच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा मंजूर बंधार्‍याच्या विषयाला हात घालून मंजूर बंधार्‍याचे काम पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत आग्रह धरला तसेच मतदार संघामध्ये बंधारा कम पूल बांधण्याची मागणी केली.

यामध्ये वडगाव कानळद, मंजूर, माहेगाव देशमुख, हिंगणी, डाऊच खुर्द, सडे, शिंगवे व पुणतांबा याठिकाणी बंधारा कम पूल बांधल्यास पावसाळ्यात पाणी साठविले जाऊन त्या पाण्याचा उन्हाळ्यात सिंचनासाठी उपयोग होऊ शकतो व त्याचबरोबर पूल बांधल्यास दळणवळणाचा मोठा प्रश्न देखील मार्गी लागून त्याचा मोठा फायदा नागरिकांना होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून कालव्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे कालव्यांचे मजबुतीकरण व दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

गोदावरी कालव्यांचे मजबुतीकरण अथवा नव्याने बांधकाम करणे गरजेचे असून त्यासाठी 600 कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केलेली आहे. त्यापैकी 78 कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल करण्यात आलेले आहेत.

त्या प्रस्तावांपैकी या बैठकीत डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यातील 13 कोटी 05 लाख 86 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. व पुढील निधी देखील तातडीने उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांनी दिली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply