Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

राहुरीत अपहरण करून पत्रकाराची हत्या

जिल्हाभरातून घटनेचा तीव्र निषेध । आरोपींना अटक करण्याची मागणी

अहमदनगर । वीरभूमी- Apr 07, 2021 • 12:00 AM 2444 views
नगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे मंगळवारी काही इसमांनी मारहाण करत स्कार्पिओ गाडीतून अपहरण केले होते. आज त्यांचा राहुरी कॉलेज रोडला मृतदेह आढळून आला.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. जिल्ह्यातील पत्रकार संघटना व सामाजिक संघटनांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे मंगळवार दुपारी 12 वाजेच्या दरम्यान अपहरण करण्यात आले होते.

पत्रकार दातीर हे राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करत त्यांना स्कॉर्पिओ गाडीत बसवले आणि निघून गेले. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता.

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन दातीर यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. त्याच रात्री राहुरी कॉलेज रोडला रोहिदास दातीर यांचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून दातीर यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आहले.

दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या रोहिदास दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक गोष्टी बाहेर काढल्या होत्या. रोहिदास दातीर यांनी आरटीआयच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले होते. याच कारणामुळे त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र पत्रकाराची हत्या झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेचा निषेध करून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply