Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

शेळी चोरांचा ग्रामस्थांवर गोळीबार

दोन जण गंभीर जखमी । तीन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

कर्जत । डॉ. अफरोजखान पठाण- Apr 10, 2021 • 12:00 AM 2978 views
कर्जत तालुक्यातील निंबोडी या गावांमध्ये शेळ्या चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात मध्ये खंडू गरड (वय 50) वर्ष व भरत बर्डे (वय 35) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

बापूराव गरड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला .

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कर्जत - जामखेड मार्गा लगत दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबोडी या गावामध्ये काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तिघे चोरटे आले होते.

त्यांनी प्रदीप गरड यांची शेळी चोरून घेऊन जात असताना प्रदीप गरड जागे झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर इतर नातेवाईकही जागे झाले. त्यावेळी तीन चोरट्यांनी शेळी घेऊन धूम ठोकली.

यावेळी आरडा ओरड एकूण शेजारी जागे झाले त्यातील सहा जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यातील बापूराव गरड यांनी मोटार सायकल वर बसलेल्या तिघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याला पाठमागून घट्ट मिठी मारली. ही झटापट अर्धतास चालली. त्यावेळी गावातून मोठा जमाव एकत्र येत असून आपले काही खरे नाही, असे समजताच मोटारसायकलवर मध्यभागी बसलेल्या चोरट्याने आपल्या गावठी कट्ट्यातून पाठलाग करणार्‍या दोघांवर गोळीबार केला.

यामध्ये खंडू गरड व भरत बर्डे हे गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी नगर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या बाबत माहिती कळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी त्यांना दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत. यावेळी सदर घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

शेळी चोरणार्‍यांकडून गोळीबाराचा प्रकार घडल्याने निंबोडी ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply