Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

या दिवशी होणार गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक

आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची माहिती

कोपरगाव । वीरभूमी- Nov 25, 2021 • 09:31 PM 881 views
गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवार (दि. 29) रोजी कोपरगाव व राहाता येथे होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

त्यानुसार डाव्या कालव्याची बैठक ही सोमवार (दि.29) रोजी सकाळी 10.00 वाजता आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे होणार आहे. तसेच उजव्या कालव्याची बैठक दुपारी 3.30 वाजता राहाता येथे होणार आहे.

मागील पाच वर्षात कालवा सल्लागार समितीच्या बैठका मुंबईला घेतल्या जात असल्यामुळे गोदावरी कालव्याचे लाभधारक शेतकरी याबैठकींसाठी उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे आवर्तन व आवर्तनाबाबत येणार्‍या अडचणी शेतकर्‍यांना मांडता येत नव्हत्या.

मात्र आ. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी लाभधारक शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घेण्याचा शब्द पूर्ण करून या बैठका लाभ क्षेत्रात होत आहे. त्यामुळे मागील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीवेळी अनेक शेतकर्‍यांना उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडता आल्या होत्या.

यावेळी देखील लाभधारक शेतकर्‍यांनी आपल्या अडचणी मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply