Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बालमटाकळीत व्यंकटेशकडून हमीभाव केंद्र सुरु

हमीभाव केंद्रामुळे शेतकर्‍यांची परवड थांबणार ः हभप. बाबा गिरी महाराज

बोधेगाव । वीरभूमी- Nov 25, 2021 • 09:39 PM 774 views
आजकाल जो तो फक्त स्वार्थासाठी जीवन जगत असतांना व्यंकटेश ग्रुपचे संचालक यांनी मात्र आपली समाजाप्रती असलेली नाळ आणि सामाजिक बांधिलकी साबुत ठेवली आहे.

त्यांनी समाजोपयोगी विविध कार्यक्रमाबरोबर आज शासनाने ठरून दिलेल्या शासकीय हमीभाव केंद्र बोधेगाव- बालमटाकळी सारख्या ग्रामीण भागात सुरु केल्याने शेतकर्‍यांची शेवगावला जाण्या-येण्यासाठी होणारी परवड थांबणार आहे, असे मत केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबा गिरी महाराज यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना गिरी महाराज म्हणाले की, शेतकरी उत्पादन घेत असताना उत्पादन आणि खर्च याचा हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्याने त्याच्या खर्चाचे बजेट कोलमडले जाते. शेतकर्‍यांना शासकीय हमिभावाप्रमाणे धान्याला दर मिळाला तर त्याला शासकीय आनुदान आणि विम्याची गरज रहाणार नाही.

परंतु हमीभावाप्रमाणे त्याला क्वचितच दर मिळाला जातो. शेअर बाजारातील सेंसेक्स वाढला तर झळाळी आली म्हणतात आणि शेतकर्‍यांच्या मालाचा दर वाढला तर त्याला महागाई म्हणतात अशी शोकांतीका शेतकर्‍यांची आहे. भविष्यात गोर-गरिब अंध परित्यक्ता यांच्या मदतीसाठी प्रयत्न कराण्याचे अवाहन महंत बाबागिरी महाराज यांनी केले.

यावेळी चेअरमन अभिनाथ शिंदे यांनी सांगितले कि, व्यंकटेशचे दोन लाख सभासद आहेत. समाजोपयोगी अनेक कार्यक्रम आम्ही व्यंकटेश ग्रुपच्या माध्यमातून घेत आहोत. यामध्ये गोशाळा, शेतकर्‍यांसाठी शेती उपयोगी व्याख्याने, कार्यशाळा, उद्योग धंद्यासाठी नवनविन संकल्पना मार्गदर्शन, दाळ मिल, आणि आता शासकीय हमिभाव केंद्राचे उद्घाटन केले असुन समाजासाठी आपण काहितरी देनं लागतो म्हणून भविष्यात त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

साईधामच्या मागे जुना हातगाव रस्त्यालगत असलेल्या शासकीय हमिभाव केंद्राचे उद्घाटन केदारेश्वरचे मठाधिपती महंत बाबा गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी मोहनराव देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणुन प्रभाकर काका हुंडेकरी उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब देशमुख, रामनाथ राजपुरे, सुधाकर तहकीक, प्रशांत देशमुख, ज्ञानदेव घोरतळे, भारत पठाडे, विक्रम बारवकर, भारत देशमुख, संदिप बामदळे, मधुकर पाटेकर सह व्यंकटेश उद्योग समुहाचे चेअरमन अभिनाथ शिंदे, संचालक व्यंकटराव देशमुख, अनिल गुंजाळ, कृष्णा मसुरे अभंग मनोज शेतकरी बप्पासाहेब भाकरेसह परिसरातील उडीद, मुग, तुर घालण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply