Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बळीराजा व मेंढपाळांना अवकाळीची नुकसानभरपाई द्या

सभापती प्रशांत गायकवाड यांची मागणी

पारनेर । वीरभूमी- Dec 05, 2021 • 08:12 PM 775 views
दोन दिवसापूर्वी पारनेर तालुक्यात अवकाळी पाऊस होऊन खरीप हंगामातील विशेषतः कांदा या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांसाठी कांदा हे प्रमुख आर्थिक उत्पन्नाचे पिक असून त्यावरच शेतकर्‍याचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते.

अवकाळीमुळे हे पिक हातचे गेल्याने शेतकर्‍याचे वार्षीक आर्थिक नियोजन संकटात सापडले असून शासनाने शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचानामे करून त्यांना आर्थिक मदत देण्याची तसेच ज्या मेंढपाळांच्या मेंढ्या दगावल्या आहेत त्यांनाही आर्थिक मदत देण्याची मागणी पारनेर बाजार समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यंदा पारनेर तालुक्यात 8 ते 9 हजार हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झालेली आहे. सुरूवातीच्या काळात सर्वच भागात कांद्याचे पिक जोमदार होते. गेल्या सात आठ दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे, रोग पडल्याने कांद्याचे पिक संपूर्णपणे नष्ट झाले आहे.

अशा स्थितीत शेतकर्‍याच्या हाती उत्पादन खर्चाच्या पाच टक्केही रक्कम मिळणे दुरापास्त होणार आहे. शेतकर्‍यांनी एक हेक्टर कांद्याच्या लागवडीसाठी 1 लाख रूपयांपर्यंत खर्च केलेला आहे. खाजगी सावकार तसेच इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन हा खर्च करण्यात आलेला आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होण्याची भिती आहे. या आपत्तीमुळे फळबागा व इतर नगदी पिकांचेही मोठे नुकसान झालेले आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीमधून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन त्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

पारनेर तालुक्यात मेंढपाळांची संख्या खूप असून यातील अनेक मेंढपाळांच्या मेंढयाही या कालावधीत कडाक्याच्या थंडीमुळे गारठून मरण पावल्या आहेत. या मेंढपाळ बांधवांनाही शासनामार्फत मदत मिळणे गरजेचे आहे.

शेतकर्‍यांनी खरीप हंगामामध्ये पिक विमा भरलेला आहे. त्यांना सबंधित विमा कंपनीकडून पुर्णपणे लाभ मिळणे आवश्यक आहे. यासंदर्भात पारनेर नगर - मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनीही शासनस्तरावर सबंधित विभागांकडे योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला असल्याचे गायकवाड यांनी या निवेदनात नमुद केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply