Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

कृषीपंपाचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी मनसेचा ठिय्या

शेवगाव महावितरण कार्यालयात मनसेचे आंदोलन । वीजपुरवठा खंडीत न करण्याबाबत दिले निवेदन

शेवगाव । वीरभूमी - Dec 10, 2021 • 01:23 PM 759 views
महावितरण कंपनीने शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकर्‍यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे.

महावितरण कंपनीने कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरीत थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे.

याबाबत शेवगाव येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात सुमारे 1 तास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण कंपनीचे उपअंभियता यांना निवेदन देऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे शेतीमालाची विक्री करण्यासाठी चांगले बाजारभाव मिळाले नाहीत. परिणामी शेतकर्‍यांची मोठी आर्थिक हानी झाली. शेवगाव व परिसरातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे त्यावर अनेक कुटुंबियांची उपजीविका चालते. शेवगाव परिसरातील बाजारपेठेचे अर्थकारण शेती व्यवसायावर अवलंबून आहे.

सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकर्‍यांनी हरभरा, गहू, मका ही पिके शेतामध्ये पेरली आहेत. तसेच परिसरात ऊस, पेरू, चिकू, डाळिंब, आंबा, सिताफळ या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. लॉकडाऊननंतर शेतीमालाला चांगल्याप्रकारे भाव मिळेल या हेतूने रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांनी पैशाची जुळवाजुळव करून शेती मशागत व बियाणे खरेदी करून शेतामध्ये रब्बी पिकांची पेरणी केली असून बियाणे उगवण्यासाठी शेतकर्‍यांची दिवस रात्रीची पर्वा न करता शेतीमालाला पाणी देण्याचे काम करीत आहे.

शेवगाव परिसरात जवळपास 60 टक्के रब्बी पेरणी झाली असून पिके जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज असताना महावितरण कंपनीने रोहित्र बंद करण्याचे काम सुरू केले आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी महावितरण कृषी पंपाची करीत असलेल्या सक्तीची वसुलीमुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. पाण्याअभावी शेतामध्ये केलेली रब्बीची पेरणी वाया जाते की काय, अशी भीती शेतकर्‍यांना वाटू लागली आहे.

महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीज वसुली त्वरित थांबवली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, रामेश्वर बलिया, देविदास हुशार, ज्ञानेश्वर कुसळकर, सागर आधाट, बाळा वाघ, संदिप देशमुख, विकास भागवत, गणेश डोमकावळे, गणेश भागवत, साईनाथ बलिया, गोरख कौसे, सुभाष लोंखडे, रामदास डाके, बाळासाहेब भागवत, अप्पासाहेब वीर,

संजय वेताळ, सचिन बेळगे, दिपक बलिया, गोरख भागवत, राम बलिया, सुरेश सूर्यवंशी, आदर्श लोखंडे, मच्छिंद्र भडके, अमिन सय्यद, विठ्ठल दुधाळ, निवृत्ती आधाट, हर्षल नांगरे, संजय वणवे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply