Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी

शिक्षक बँकेसमोर गुरूकूल, शिक्षक समितीचा घंटानाद

शिक्षक बँकेसमोर गुरूकूल, शिक्षक समितीचा घंटानाद

शेवगाव । वीरभूमी- Feb 02, 2022 • 07:40 PM 1133 views
कोरोनामुळे प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्ष झाले तरी निवडणुका झाल्या नाहीत. सत्ताधारी संचालक मंडळाने वाढीव मुदतीत अर्थिक लाभापोटी सभाहित डावलल्याचा आरोप करीत गुरूकूल मंडळाच्या तालुका शाखेच्यावतीने प्राथमिक शिक्षक बँकेच्या शेवगाव शाखेसमोर बुधवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

संचालक मंडळाने त्वरीत राजीनामे देऊन प्राथमिक शिक्षक बँकेची पंचवार्षिक निवडणूक त्वरीत जाहीर करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

गुरूकूल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी संचालक रघुनाथ लबडे, प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सचिन वांढेकर, गुरूकूलचे तालुकाध्यक्ष आत्माराम केदार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

यावेळी बँकेचे शाखाधिकारी महेश माने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्ष होत आले तरी वाढीव मुदतीत संचालक मंडळाने अतिशय जबाबदारीने निर्णय घेणे अपेक्षित होते. प्रशासनही बँक अथवा सभासदहिताऐवजी संचालक मंडळाला साथ देत आहे.

संचालकांनी वाढीव मुदतीत अर्थिक लाभापोटी सेवाज्येष्ठता डावलून कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्या केल्या. नातलग असलेल्या निलंबित शिपायाला लेखनिकाचे पद देत वेतनवाढी दिल्या. त्यांच्या पगाराचा व फरकाचा तपशील सभासदांपुढे जाहीर करावा. संगणक खरेदी, त्या पाठोपाठ सीसीटिव्ही, सायरन खरेदीची आवश्यकता नसताना निविदा काढण्यात आली. वाढीव मुदतीतील ही बाब बँकेच्या दृष्टीने अत्यंत घातक व धोक्याची आहे.

काही संचालक म्हणतात आम्हाला न विचारता निविदा काढण्यात आल्या आहेत. ही बाब म्हणजे कुणाला कुणाचा धरबंद राहिलेला नाही. संचालकच अंधारात असतील तर बँकेत मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. तरी थोडीजरी नैतिकता शिल्लक असेल तर सर्व संचालक मंडळाने त्वरीत राजीनामे द्यावेत. अन्यथा गुरूकूल मंडळ व शिक्षक समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष बापूराव आर्ले, दादासाहेब अकोलकर, अशोक टेकुळे, तुकाराम भगत, संजय गीतखने, निळकंठ आमले, दगडू गटकळ, रावसाहेब बोडखे, दिगंबर देवढे, निळकंठ लबडे, ज्ञानेश्वर बोडखे, सुनंदा सातपुते, गोरक्षनाथ बर्डे, बाबूराव मुटकुळे, शिवाजी लबडे, रामनाथ कारगुडे, संजय पुंडे, बजरंग देवकर आदींसह कार्यकर्ते व प्राथमिक शिक्षक सभासदांच्या सह्या आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply