Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

मी प्रत्यक्ष मंजूर कामांचे भुमीपूजन करतो

माजी आ. राहुल जगताप । पोकळ आश्वासने देत नसल्याची स्पष्टोक्ती

श्रीगोंदा । वीरभूमी- Feb 27, 2022 • 04:29 PM 1277 views
मी प्रत्यक्ष मंजूर कामांचे भुमीपूजन करतो, पोकळ आश्वासने देत नाही. लोकांच्या अडचणी समजून तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहे. कामाच्या बाबतीत काही अडचणी आल्यास जनतेने माझ्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक माजी आ. राहुल जगताप यांनी केले.

नगर-श्रीगोंदा मतदार संघातील रायगव्हाण (वराळे मळा) येथील सिमेंट साठवण बंधर्‍याचे भुमीपूजन माजी आ. जगताप यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या बंधार्‍यासाठी औरंगाबाद महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत 22 लाख 11 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

साठवण बंधार्‍याचे भुमीपूजनानंतर माजी आ. राहुल जगताप म्हणाले, मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन् त्यांच्या विकासासाठी आहोरात्र झगडत राहणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. या साठवण बंधार्‍याची येथील ग्रामस्थांची अनेक दिवसापासूनची मागणी होती. आज प्रत्यक्ष कामाला सुरवात केली, असल्याचे ते म्हणाले.

यावेळी रायगव्हाणचे ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, पंचायत समिती सभापती शंकरराव पाडळे, पंचायत समिती सदस्य अतुल लोखंडे, कुकडी कारखाना माजी संचालक बाळासाहेब पठारे, गोवर्धन हार्दे, मनोहर शिंदे, वाल्मीक खेडकर, रोहीदास कदम, सरपंच संजय रिकामे, उपसरपंच बाळासाहेब वराळे, मोहन हार्दे,

माजी चेअरमन सखाराम हार्दे, सोन्याबापू शिंदे, गणेश शिंदे, अमोल कदम, गणेश रिकामे, मानसिंग गायकवाड, विठ्ठल हार्दे, पप्पु हार्दे, आप्पा लाड, रघुनाथ हार्दे, बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब हार्दे, हरीभाऊ जाधव, देविदास चावरे, सुरेश वराळे आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply