Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी

लिज्जत पापडचे सुरेशराव कोते यांना सूर्यदत्त नॅशनल पुरस्कार प्रदान

ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात आला पुरस्कार

अकोले । वीरभूमी- Mar 08, 2022 • 01:30 PM 1058 views
अकोले तालुक्याचे भूमिपुत्र तथा लिज्जत पापड, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते यांना पुणे येथे आज सुर्यदत्त नॅशनल अवार्ड पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. कर्नाटका राज्याचे गव्हर्नर ठावरचंद गेहलोत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुरेशराव कोते हे मागील महिन्यात सोशल फाऊंडेशन, पुणे, महाराष्ट्रचा या वर्षीच्या ‘कर्तव्यम् प्रेरणा पुरस्कार-2022’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाले.

दिनांक 22 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 11 वाजता राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते पुरस्कार त्यांना प्रदान झाला होता.

सुरेशराव कोते हे अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ (ता. अकोले) येथील रहिवासी असून दानशुर कर्तुत्व संपन्न व्यक्तिमत्व आहे.शुन्यातून विश्व निर्माण करणारे श्री. कोते त्यांच्या साधेपणामुळे आणि मदतीला धावून जाणार्‍या वृत्तीमुळे आणि त्यांच्या शांत, मितभाषी, प्रेमळ व्यक्तिमत्वाच्या स्वभावामुळे सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत.

त्यांनी अनेक समाजसेवी संघटनेचे अध्यक्ष पद भूषविलेले असून ते आजही अनेक समाजसेवी संस्थांवर कार्यरत आंबेत. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्करांनी सन्मानीत केले आहे. अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेला नवसंजीवनी देण्याचे महत्वपूर्ण योगदान श्री. सुरेशराव कोते यांनी दिले आहे.

अनेक संस्था, वाचनालये, मंदिरे, तसेच सामाजिक उक्रमांसाठी त्यांनी आजपर्यंत अनेक वेळा योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत लिज्जत पापड या देशपातळीवरील संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करत आहे. रेड स्वस्तिक, पुण्यातील लक्ष्मी बँक, तसेच कोतुळ, वाघापूर, अकोले, मूळमाता देवस्थान ट्रस्टच्या व अकोले येथील अभिनव शिक्षण संस्था अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर ते काम करत आहेत.

यापूर्वी देशांचे राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्यांना आज सोमवारी हा पुरकार पुणे येथे प्रदान करण्यात आल्याने त्यांचे अहमदनगर, पुणे जिल्हा तसेच अकोले तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply