Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

धावत्या टेम्पो ट्रॅव्हलरला आग

प्रसंगावधान राखल्याने ट्रॅव्हलरमधील 10 भाविक सुखरुप

संगमनेर । वीरभूमी - May 28, 2022 • 05:14 PM 1676 views
शिर्डी येथून भिमाशंकरला देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणार्‍या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागून खाक झाला. वेळीच टेम्पो ट्रॅव्हलर मधील 10 भाविक खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शिर्डी येथील ट्रॅव्हलर चालक विजय कोंडीबा काकडे हे आज सकाळी शिर्डी येथून 10 भाविकांना घेऊन भिमाशंकरला चालले होते. भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर पुणे- नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटातून जात असतांना टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली.

आग लागल्याची जाणीव होताच चालकाने गाडी थांबवून सर्व भाविकांना खाली उतरण्यास सांगितले. आग लागल्याची माहिती कळताच गाडीतील सर्व भाविक लागलीच खाली उतरले.

टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सपोनि. सचिन सूर्यवंशी, पंढरीनाथ पुजारी, नारायण ठोकरे, योगीराज सोनवणे यांच्या पथकाने घटनास्थळी घेऊन आग विझविण्यासाठी अग्निशमन बंबला पाचारण केले.

संगमनेर नगरपरिषदेचा बंब घटनास्थळी दाखल होत आग विझवली. मात्र आग एवढी तीव्र होती की, काही क्षणातच टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक झाला.

प्रसंगावधान राखत चालकाने ट्रॅव्हलरमधील सर्वच्या सर्व 10 भाविकांना वेळेत खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

मागील काही दिवसापासून पुणे- नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात वाहनांना आग लागण्याच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे अशा घटना रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply