Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

नोकरी करून नोकर बनण्यापेक्षा व्यवसाय करून मालक बना

प्रा. गणेश शिंदे । शेवगावात ‘जनशक्ती युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

शेवगाव । वीरभूमी - Jul 18, 2022 • 12:35 AM 772 views
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तसे आजच्या ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांना घडवलं पाहिजे. स्वत:च्या पायावर उभं केलं पाहिजे. युवकांनो तुमच्यातील सुप्तगुण शोधा. मोठी स्वप्न पहा व ते सत्यात उतरवण्याकरीता त्याचा पाठलाग करा. नोकरी करून नोकर बनण्यापेक्षा व्यवसाय करून मालक बना, असे प्रतिपादन प्रा. गणेश शिंदे यांनी केले.

शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनशक्ती युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रा. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ.शिवाजीराव काकडे हे होते.

यावेळी जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, महाराष्ट्र उद्योजगता विकास केंद्र अ.नगरचे प्रकल्प अधिकारी, तात्यासाहेब जिवडे, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, राजू जिजा, संजय आंधळे, अशोकराव ढाकणे, सुनील काकडे, लखन पातकळ, पृथ्वीसिंग काकडे, माणिक गर्जे, देविदास गीर्‍हे, अकबर शेख, विनोद मोहिते, रज्जाक शेख, वजीर पठाण, वैभव पूरनाळे, मनोज घोंगडे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा.शिंदे म्हणाले की, युवकांनी सोशल मीडियाचा वापर योग्य ठिकाणी केला पाहिजे. आपण मोबाईलला नाही तर मोबाईल आपणास चालवतोय अशी परिस्थिती झाली आहे. आजचे तरूण-तरुणी अनुकरण प्रिय आहेत. दुसर्‍याचे अनुकरण करण्यात आपण वेळ वाया घालवतो. तुम्ही स्वतःतील वेगळेपण शोधा. आज व्यवसाय क्षेत्रात परप्रांतीय आढळतात, आणि आपली मुल नोकरीच्या रांगेत. त्यामुळे खर तर आज ही परिस्थिती बदलली पाहिजे.

व्यवसाय करण्यासाठी हिम्मत लागते. ती स्वतःतच असते, बाजारात विकत मिळत नाही. त्यामुळे आजच्या युवकांनी हिम्मत दाखवली पाहिजे. इतर फंद्यात पडण्यापेक्षा व्यवसायात पडा, असे आव्हानही यावेळी त्यांनी युवकांना केले.

शेवगावला एम.आय.डी.सी. करून युवकांना व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, अशा आशयाचे निवेदन तालुक्यातील युवकांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महा.व्यवस्थापक अतुल दवंगे यांना यावेळी दिले.

यावेळी कार्यक्रमासाठी म्हातारदेव आव्हाड, बाळासाहेब नरके, भाऊसाहेब सातपुते, भाऊसाहेब बर्डे, अशोक दातीर, शिवाजी कणसे, भारत लांडे, भगवान डावरे, अक्षय भोसले, बाबासाहेब फलके, निलेश वामन, बापूराव गाढे, कृष्णा सरोदे, दत्तात्रय आव्हाड, संदीप हिंगे, राजू मंचरे, भाऊसाहेब राजळे, बाबासाहेब मस्के, लखन फलके, विनोद पवार, बबन गायकवाड, बाबासाहेब देवढे सुरेश काजळे, भारत भालेराव, बाबासाहेब काळेयांच्यासह हजारो युवक व युवती कार्यक्रमास हजर होते.

यावेळी आलेल्या हजारो युवक-युवतींचे स्वागत पृथ्वीसिंह काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. डॉ. शिवाजीराव काकडे यांनी केले. सूत्रसंचालन गोविंद वाणी यांनी केले. मेळाव्याला आलेल्या हजारो युवक-युवतींशी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी हितगुज साधले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply