Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जगदंबा देवी न्यासाच्या विश्वस्त निवड प्रक्रियेत अपारदर्शकता?

अर्ज छाननीत मनमानी, बाह्य हस्तक्षेपाचा आरोप, न्यायिक चौकशीची ग्रामस्थांची मागणी

पाथर्डी । वीरभूमी- Oct 15, 2025 • 01:38 PM 441 views
श्री जगदंबा देवी सार्वजनिक न्यास, मोहटे यांच्या विश्वस्त निवड प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अपारदर्शकता, मनमानी व अन्याय्य अपात्रता झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात 13 ऑक्टोबर 2025 रोजी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहिल्यानगर यांच्याकडे तात्काळ हस्तक्षेप करून निवड प्रक्रियेत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

10 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखत यादीत अनेक पात्र उमेदवारांना अन्याय्यपणे वगळण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपात्रांची यादी बेकायदेशीर, अपूर्ण आणि पारदर्शकतेविना तयार करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अर्ज नाकारण्याची कारणे अत्यंत किरकोळ व तांत्रिक असून त्यांना कोणताही कायदेशीर किंवा नैतिक आधार नाही. अनुभवाचे प्रमाणपत्र नसणे, साक्षांकित नसलेली कागदपत्रे किंवा एकत्रित कुटुंबाचा उत्पन्न दाखला जोडणे यांसारख्या किरकोळ कारणांवर अर्ज अपात्र ठरविण्यात आले.

तसेच अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेण्याची कोणतीही प्रक्रिया न राबवल्याने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला. काही अर्ज हेतुपुरस्सर अपात्र ठरवून विशिष्ट गटाला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामसभेत बहुमताने ठराव करण्यात आले. यामध्ये अपात्रतेची यादी तत्काळ रद्द करावी. सर्व पात्र अर्जदारांना मुलाखतीची संधी द्यावी. निवड प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी. संपूर्ण छाननी प्रक्रियेवर स्वतंत्र न्यायिक चौकशी करावी. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना प्रक्रियेतून दूर ठेवावे. या ठरावाचा समावेश आहे.

ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, श्री जगदंबा देवी सार्वजनिक न्यास हा आमच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे; त्यामुळे निवड प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य आणि निःपक्षपाती असावी.

ठराव बाबासाहेब रामकिसन फुंदे यांनी मांडला, महादेव निवृत्ती फुंदे यांनी अनुमोदन दिले, तर सरपंच मनिषा दहीफळे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply