Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा

अगोदर चोराची तक्रार घेतली । नंतर शेतकर्‍यांची तक्रार । पोलिसांची भूमिका संशयास्पद

पाथर्डी । वीरभूमी - Oct 13, 2025 • 10:20 PM 1792 views
तालुक्यातील निवडूंगे व कासार पिंपळगाव परिसरात डाळींब चोरीसंदर्भात चक्क उलटप्रसंग घडला आहे. शेतात चोरी करताना तीन चोरटे आढळले. शेतमालक व ग्रामस्थांनी एकाला पकडले, दोघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पकडलेल्या चोरट्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र त्यानंतर उलटच घडले. चोरी करायला आलेल्या चोरट्यानेच शेतमालक व त्यांच्या शेजार्‍यांविरुद्ध सोन्याची चैन व मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तीच तक्रार प्रथम नोंदवली, तर शेतकर्‍यांची डाळींब चोरीची तक्रार उशिरा घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे पोलिसांची भूमिकाच संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातील निवडूंगे व कासार पिंपळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून डाळींब चोरीच्या घटनांनी शेतकरी हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी गावात ग्रामसभा घेऊन संतप्त नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. सभेला सरपंच वैभव देशमुख, उपसरपंच बाबासाहेब ढवळे, माणिकराव सावंत, विठ्ठलराव मरकड (सर), रखमाजी मरकड, उद्धवराव ससे, नवनाथ कोलते, अमोल मरकड, गणेश क्षीरसागर, आसाराम ससे यांच्यासह शंभरहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

याबाबत समजलेली माहिते अशी की, निवडुंगे-कासार पिंपळगाव शिव परिसरात राहणारे भाऊसाहेब नामदेव हाडके यांच्या शेतात पहाटे तीन वाजेच्या सुमारास प्रशांत दिलीप गायकवाड, शिवाजी मारुती सावंत आणि रामा नारायण सावंत हे तिघे डाळींब तोडत होते. शेतमालक हाडके व शेजारील शेतकरी बाळासाहेब सातपुते, अशोक क्षीरसागर आणि इतरांनी तिघांना रंगेहात पकडले. दोन चोर अंधारात पळून गेले, तर गायकवाडला नागरिकांनी पकडून दोरीने बांधून ठेवले.

पोलिस आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पण त्यानंतर प्रशांत गायकवाडने पोलिसांत तक्रार देत दावा केला की, त्याचे मित्र सावंत या दोघांनी आपण डाळींबाचा बाग विकत घेतला आहे असे सांगून त्याला फसवले. तसेच, ग्रामस्थांनी त्याला मारहाण करून दीड तोळ्याची सोन्याची चैन व वनप्लस मोबाईल हिसकावला, अशी तक्रार दिली. या तक्रारीवर पोलिसांनी भाऊसाहेब हाडके, अशोक क्षीरसागर, बाळासाहेब सातपुते, निखील हाडके आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेतकर्‍यांची तक्रार नोंदवायला विलंब ः चोरी गेलेल्या दहा पोती डाळींबाबाबत शेतमालक भाऊसाहेब हाडके यांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास सुरुवातीला नकार दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर डाळींब चोरीची नोंद करण्यात आली.

या प्रकारानंतर निवडूंगे गावातील माणिक सावंत यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, शेतात चोरी करायला आलेल्या चोराची तक्रार आधी नोंदवणार्‍या पोलिसांना राज्य सरकारने बक्षीसच द्यायला पाहिजे!

गावात आतापर्यंत सहा ते सात शेतकर्‍यांची डाळींब चोरीला गेली असून, तपासात कुठलीच प्रगती नाही. पप्पू गोरक्ष क्षीरसागर, दत्तु भाऊ मरकड, नानासाहेब ससे, रामदास दशरथ ढवळे आदींच्या शेतातील डाळींब, मोटार, एसटीपी उपकरण चोरीला गेल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणात पोलिस अधिकारी आणि काही कर्मचार्‍यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही एजंटांनी पोलिसांत मध्यस्थी केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवडुंगा व कासार पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply