Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध

अतिवृष्टीने नुकसान ः नगर जिल्ह्यासाठी 75 कोटी 26 लाख 81 हजार रुपयांचा पहिला हप्ता

किमान 33 टक्के नुकसान झालेल्या पिकांना मिळणार नुकसान भरपाई

अहमदनगर । वीरभूमी - Nov 09, 2020 • 12:00 AM 2563 views
जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी राज्यातील विविध जिल्ह्यासाठी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. या आदेशात नगर जिल्ह्यासाठी 75 कोटी 26 लाख 81 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे म्हटले आहे.

राज्यातील विविध भागात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व फळ पिकांचे नुकासान झाले आहे. या नुकसानीची शासनस्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मंत्र्यांनी पाहणी केली होती. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या.

त्यानंतर तातडीने मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत दिवाळी अगोदर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शेतीपिकांसाठी हेक्टरी 10 हजार रुपये तर फळपिकांसाठी हेक्टरी 25 हजार रुपयाची मदत देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना मदत देतांना शिक्षक-पदवीधरच्या निवडणुकीचा अडसर निर्माण होतो की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आज राज्य सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यातील मदत देण्याची घोषणा शासन निर्णय पारित करून जाहीर केली.

राज्यातील विविध जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचा आदेश काढण्यात आला. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी 75 कोटी 26 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र ही मदत देतांना सरसकट ऐवजी 33 टक्के नुकसानग्रस्त पिकांना मिळणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply