Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

महाराष्ट्रात या तारखेपर्यंत राहणार निर्बंध

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उपाय योजना

मुंबई । वीरभूमी - Nov 27, 2020 • 12:00 AM 4048 views
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने 30 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी कमी केलेले निर्बंध आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत कायम राहणार आहेत. याबाबत ठाकरे सरकारकडून शुक्रवारी आदेश जारी करण्यात आला.

कोरोनाच्या जीवघेण्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत राज्य सरकारने कमी केलेले निर्बंध कायम ठेवले आहेत. तसेच राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यातच दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविडबाबतचे नियम पाळण्याचे बंधन मात्र असणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचं समोर आलं. खरंतर, मिशन बिगिनच्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे. यामुळे 31 डिसेंबरपर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.

खरंतर, देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली होती. केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे:

* सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

* सामाजिक अंतर राखणं गरजेचं

* सतत हात धुणे आवश्यक

* चित्रपटगृहात 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी

* जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी

* धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी

* बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply