Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकरी हिताचे निर्णय

आमदार आशुतोष काळे; कोपरगावात शासकीय मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु

कोपरगाव । वीरभूमी - Dec 10, 2020 • 12:00 AM 875 views
रोना संकटात सर्व जग थांबलेले असतांना शेतकरी मात्र आपल्या शेतात राबतच होते. त्यावेळी सर्व काही ठप्प असल्यामुळे शेतातून उत्पादित झालेला शेतमाल विक्रीसाठी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागला. मागील वर्षी व यावर्षी देखील मोठ्याप्रमाणावर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवून शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकरी हिताचे निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे सरकारप्रती शेतकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येशासकीय मका हमीभाव खरेदी केंद्राचे उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयाकडून येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी जनता दरबाराच्या माध्यमातून शासकीय मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीला दिल्या होत्या.

त्याप्रमाणे मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होणार असून शासनाच्या निकषानुसार एफ.ए.क्यू. दर्जाची मका १८५० रुपये दराने शासन खरेदी केली जाणार आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी कर्ज माफी, अतिवृष्टी अनुदान, रखडलेले ठिबकचे अनुदान देऊन कोरोनाच्या संकटात देखील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. दुसरीकडे केंद्र सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे अन्यायकारक कृषी कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची पैसे मिळतील याची हमी नाही.

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही. अशा प्रकारचे चुकीचे कायदे शेतकरी हिताचे नसून केंद्र सरकारला बाजार समित्यांचे अस्तित्व संपवायचे आहे का? अशी शंका येते. शेतकऱ्यांनी मागितले नसतांना देखील नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादले जात आहे. त्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन अजून चिघळू न देता हे कायदे तातडीने मागे घ्यावे असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्माकांत कुदळे, हरिभाऊ शिंदे, विठ्ठलराव आसने, नारायण मांजरे, अशोकराव काळे, ज्ञानेश्वर मांजरे, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे, माजी उपसभापती राजेंद्र निकोले, माजी सदस्य भरत बोरणारे, सुधाकर गाढवे, माधवराव गोसावी, दादासाहेब टुपके,सुभाषराव गाडे, भाऊसाहेब शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रोहिदास होन,

विद्यार्थी शहराध्यक्ष स्वप्नील पवार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, दिनकर खरे, रमेश गवळी, फकीरमामु कुरेशी, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, राजेंद्र खैरनार, राजेंद्र आभाळे, सागर लकारे, राजेंद्र वाकचौरे, मुकुंद इंगळे, दिनेश पवार, गणेश घुमे, फिरोज पठाण, व्यापारी तुषार सरोदे, महेंद्र ठक्कर, राजू सांगळे, आप्पासाहेब सांगळे, हृषीकेश सांगळे, गणी बागवान, अमोल गाडेकर, पप्पू पवार, आप्पासाहेब वक्ते, आश्विल समदडीया, बाळासाहेब खैरनार, सनी आव्हाड, सचिन लिहोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रनशूर, परशुराम सीनगर, विठ्ठल पवार, बाळासाहेब चांदगुडे,मनोज थोरात, शशिकांत लोखंडे, संजय जगझाप, प्रशांत कोपरे, संतोष मुरडनर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply