Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

गर्भगीरीच्या जैवविविधतेला लागली घातक तणांची किड

टिथोनिया व कॉसमॉस या तणसदृश्य वनस्पती झपाट्याने पसरतेय । वेळीच नष्ट करण्याची गरज

अहमदनगर । वीरभूमी- Oct 19, 2021 • 12:00 AM 1952 views
यावर्षी भरपुर पाऊस झाल्याने करंजी घाटातील हिरव्यागार व मनमोहक परिसरात कॉसमॉस व टिथोनियाची फुलेही डोलु लागली आहेत. प्रवासी या घाटांजवळ थांबुन या फुलांसोबत उत्साहाने छायाचित्रे घेतांना निदर्शनास येत आहेत. परंतु या वनस्पतींचे हे सौंदर्य जितके भुरळ घालत आहे त्यापेक्षाही त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे भविष्यात खुपच घातक ठरणारे असल्याने वेळीच यावर नियंत्रण मिळवणे अतिशय गरजेचे झाले असल्याचे मत निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम श्रीरंग सातपुते यांनी व्यक्त केले आहे.

अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहाने केलेल्या सर्वेक्षणानुसार चार वर्षांपुर्वी अहमदनगर येथील भुईकोट किल्ला परिसरातुन टिथोनिया व कॉसमॉस या वनस्पतींचे तण झपाट्याने फोफावत असल्याचे वनविभागाच्याही निदर्शनास आणुन दिले होते.

गेल्या दोन वर्षांपासुन या तणसदृश विदेशी वनस्पती थेट गर्भगीरीच्या डोंगररांगांमध्ये पोहचल्याचे दिसुन येत आहे. या समुहातर्फे रानफुले व फुलपाखरांचे सर्वेक्षण दरवर्षी गर्भगीरीच्या डोंगररांगांमध्ये केले जाते. त्यावेळी या टिथोनिया व कॉसमॉसचे रोपे गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये निदर्शनास आल्याबरोबरच या समुहातील सदस्यांनी यांचे निर्मुलन करण्यासाठी तातडीने सुरूवात केली. परंतु एवढे करूनही यावर्षी या टिथोनिया व कॉसमॉस या वनस्पतींची वाढ प्रचंड प्रमाणात झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. या वनस्पतींचे उगमस्थान विदेशात असुन ते शोभिवंत वनस्पती म्हणुन भारतात आणल्या गेल्या.

करंजी घाटासह गर्भगीरीची ही डोंगररांग म्हणजे अहमदनगर व बीड जिल्ह्याचे निसर्गवैभव आहे. या ठिकाणच्या जैवविविधतेमुळे जिल्ह्याला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे. या गर्भगीरीच्या डोंगररांगांमध्ये संस्थेच्या सदस्यांनी गेल्या काही वर्षांपासुन वनस्पती, रानफुले, फुलपाखरे व पक्षांचे सर्वेक्षण सातत्याने केलेले आहे.

या भागात दिडशे पेक्षा अधिक प्रजातींच्या दुर्मिळ रानफुलांची नोंद घेतली गेली असुन अर्जुन, अश्वगंधा, वेखंड, ब्राम्ही, सफेद मुसळी, पुनर्नवा, अनंतमुळ, जेष्ठमध, मंजिष्ठा, सोनमुखी, टेटु, सर्पगंधा, रिंगणी अशा अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती या डोंगररांगांमध्ये गुण्यागोविंदाने नांदत असुन या तणसदृश वनस्पतीमुळे लवकरच ही जैवविविधता संपुष्टात येवू शकते.

टिथोनिया व कॉसमॉस या वनस्पतीची बिभस्थता अनुभवायची असेल तर कात्रजघाटापासुन ते सातार्‍यापर्यंत शेकडो किलोमिटरच्या परिसरात या वनस्पतीचेंच साम्राज्य उरलेले आहे. प्रत्येक हिवाळ्यात रानजाईच्या सुगंधाने दरवळुन जाणार्‍या या गर्भगीरीला जणु या भुरळ घालणार्‍या तणाची नजरच लागली आहे.

टिथोनिया व कॉसमॉस या वनस्पती फुलायला सुरूवात झाली की, सहज सापडतात. त्याचवेळी बीया परिपक्व होण्यापुर्वी त्या उपटुन जाळुन नष्ट करणे एवढा यावर एकमेव उपाय असुन लवकरच निसर्गप्रेमी समुहातर्फे ही मोहिम हाती घेतली जाणार आहे. परंतु यासाठी प्रशासन व स्थानिक मनुष्यबळाचीही गरज असणार आहे, अशी अपेक्षा निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम श्रीरंग सातपुते यांनी व्यक्त केली आहे.

मुळत: विदेशी असल्याने यावर वाढणारी किड आपल्याकडे नाही अथवा या वनस्पती जनावरेही अथवा इतर प्राणी खात नाहीत. एक वनस्पती हजारोंच्या संख्येत बीया तयार करते व बीया जमिनीवर पडुन वर्षभर सुस्थितीत राहतात व पुढील वर्षी पुन्हा झपाट्याने फोफावतात. या वनस्पतींची तग धरून ठेवण्याची क्षमता कॉग्रेस गवतापेक्षाही कित्येक पटींने अधीक असते. त्यामुळे यांचा प्रसार खुप झपाट्याने होतो.

या तणसदृश वनस्पतींच्या निमुर्लनाची मोहिम व्यापक स्वरूपात लवकर हाती घेतली गेली नाही तर गर्भगीरीच्या जैवविविधता संपन्न डोंगररांगा अल्पावधीतच या निरूपयोगी वनस्पतींनी व्यापल्या जातील. विविधोपयोगी, औषधी व स्थानिक वनस्पतींची तसेच जनावरांच्या चार्‍याची जागा टिथोनिया व कॉसमॉस या वनस्पती अल्पावधीतच बळकावुन घेतील.

या तणसदृश वनस्पतींच्या बीया परिसरातील शेतांमध्ये रूजुन शेतकर्‍यांपुढेही यांचे निर्मुलन करण्याची मोठी समस्या भविष्यात उभी राहु शकते. टिथोनिया व कॉसमॉस या तणसदृश वनस्पतींमुळे जैवविविधतेची होणारी हानी एखाद्या वनव्यापेक्षाही भयंकर ठरू शकते, असा संभाव्य धोका निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम श्रीरंग सातपुते यांनी वर्तवला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply