शेवगाव तालुक्यातील 14 गावांसाठी अतीवृष्टीचे 34 लाख रुपयांचे अनुदान जमा
बोधेगाव । वीरभूमी- 27-Mar, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील वर्षी रब्बी हंगामातील गहु, हरबरा सह इतर पिकांचे अतीवृष्टीने नुकसान झाले होते. या नुकसानीने शेवगाव तालुक्यातील शेतकरी हतबल झाला होता.
या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकर्यांना मिळण्यासाठी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने तालुक्यातील 14 नुकसानग्रस्त गावांना 34 लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात बळीराजाने मोठ्या कष्टाने रब्बी पिक घेण्याकरिता कंबर कसून शेतशिवार पिकवलं परंतु नशिबच फाटकं, त्याला एकीकडुन शिवण्याचा प्रयत्न केला की, दुसरीकडून उसवतं. अशीच गत शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांची झाली होती.
खरिपात शेतशिवार पाण्याखाली तर रब्बीत अती पावसाने पिके उध्वस्त झाल्याने बळीराजा मेटाकुटीला आला होता. हातातोंडाशी आलेल्या घासावर निसर्गाने घाला घातल्याने शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी नुकसानग्रस्त भागांची पहाणी करत शेतकर्यांना अधार दिला.
शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांना मदत मिळून देण्यासाठी घुले यांनी शासन दरबारी प्रयत्न केले. वेळोवेळी केलेल्या प्रयत्नाने शेवगाव तालुक्यातील एरंडगाव, लाखेफळ, दहिफळ, खुंटेफळ, कर्जत खु., ढोरहिंगणी, दादेगाव, ताजनापुर, बोडखे, भायगाव, भातकुडगाव, खामगाव, जोहरापुरफ हिंगणगाव-ने या 14 गावांतील नुकसानग्रस्त 251 हेक्टर क्षेत्रासाठी 33 लाख 97 हजार 140 रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान शेतकर्यांचे खर्या आर्थाने आश्रू पुसण्याचे काम सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांमधून आभार मानुन आनंद व्यक्त केला जात आहे.
Comments