अहमदनगर । वीरभूमी - 31-May, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोमवार दि. 31 मे रोजी जिल्ह्यातील आकडेवारी हजाराच्या आत आली आहे. जिल्ह्यातील आकडेवारीत मोठी घट झाली असून आज जिल्ह्यात फक्त 912 कोरोना बाधित आढळले आहे.
अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर व नगरकरांच्या संयमी वागणुकीमुळे कोरोना बाधितांची आजची संख्या घटली आहे. अशी आकडेवारीमध्ये घट होत राहील्यास लवकरच संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये मोठी घट झाली असून आज सोमवारी तब्बल 528 ने घट होऊन आकडा 912 वर आला आहे. अनेक दिवसानंतर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये सर्वोच्च आकडा हा संगमनेर तालुक्याचा राहीला असून त्या खालोखाल नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर यांचा क्रमांक लागतो.
आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 223, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 359 तर अँटीजेन चाचणीत 330 असे 912 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगमनेर 137, नेवासा 81, शेवगाव 78, श्रीरामपूर 70, नगर ग्रामीण 63, पारनेर 59, अकोले 57, श्रीगोंदा 55, जामखेड 49, नगर शहर 45, राहाता 42, राहुरी 40, पाथर्डी 38, इतर राज्य 32, कर्जत 26, कोपरगाव 26, इतर जिल्हा 12 भिंगार 02 असे कोरोना बाधित आढळले आहे.
नागरिकांनी असाच संयम ठेवल्यास आकडेवारी कमी होऊन संपूर्ण जिल्हा कोरोना मुक्त होईल. यासाठी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.
xfGAToVElXBUCzP